महामेष योजनेसाठी ५००० कोटी रुपयांची तरतूद करावी यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रासपची मागणी
![]() |
वीज बिल व महामेष निधी बाबत निवेदन देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना रासपचे युवा नेते अजित पाटील |
मुंबई/प्रतिनिधी
मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री तथा वित्त व ऊर्जा मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्याणचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील यांनी दिले.
उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे प्रामुख्याने दोन मागण्या केल्या आहेत. जानकर यांच्या मागणीचे निवेदन पक्षाचे युवक अध्यक्ष अजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये महादेव जानकर पशुसंवर्धन मंत्री असताना खास धनगर समाजासाठी निर्माण करण्यात आलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेकरिता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ५००० कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी. तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे थकीत विज बिल संपूर्ण पणे माफ करावे व शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास विज मोफत देण्यात यावी ही मागणी फडणवीस यांच्याकडे केली.
फडणवीस यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्कीच महामेष योजनेकरिता भरीव निधी देऊ व बाकीच्या मागण्याचा ही सकारात्मक विचार करू असे आश्वासित केल्याचे पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment