राष्ट्रीय समाज पक्ष नागपूर जिल्हा आढावा बैठक पार
आज दिनांक २६/०२/२०२३ रोजी नागपूर येथे राष्ट्रीय समाज पक्ष नागपूर जिल्ह्य आढावा बैठक पार पडली. बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ प्रांत अध्यक्ष एड. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने सर्व उमेदवार उभे करण्यासाठी, पक्ष बांधणी करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. तसेच वर्धा जिल्हा अध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment