Monday, February 27, 2023

रासपच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी वंदिले, सरचिटणीसपदी गुजरकर, किसान आघाडी अध्यक्षपदी देवतळे

रासपच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी वंदिले, सरचिटणीसपदी गुजरकर, किसान आघाडी अध्यक्षपदी देवतळे 

वर्धा : यशवंत नायक ब्यूरो

राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्धा जिल्हा अध्यक्षपदी सुनील वांदिले, जिल्हा महासचिवपदी सुनील गुजरकर व किसान आघाडीचे अध्यक्षपदी रविंद्र देवतळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील सर यांनी यशवंत नायकला कळवले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष  काशिनाथ (नाना) शेवते, राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर गेली तीन दिवसापासून विदर्भाचे दौऱ्यावर आहेत.  यावेळी विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्हाध्यक्षपदी सुनील वांदिले, जिल्हा महासचिवपदी सुनील गुजरकर तर किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पदी  रविंद्र देवतळे यांची नियुक्ती करण्यात आली व प्रदेशाध्यक्ष व महासचिव यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अधयक्ष काशिनाथ नाना शेवते व प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर विदर्भाचे दौऱ्यावर आज वर्धा येथून यवतमाळ जिल्हा बैठकीला जात आसताना, श्री क्षेत्र कळंब येथील चिंतामणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी आगामी निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्ते / पदाधिकारी यांना बळ आणि आशीर्वाद द्या, असे साकडे घातले. यावेळी विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख कृषीसम्राट राजेंद्र पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...