दि. २१ रोजी पनवेल मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा
पनवेल : यशवंत नायक ब्यूरो
दिनांक २१ फेब्रुवारी वार मंगळवार या दिवशी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे दुपारी २ वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती रासपचे कोकण प्रांत राज्य कार्यकारणी सदस्य श्री भगवान ढेबे यांनी 'यशवंत नायक'शी बोलताना दिली.
श्री. ढेबे पुढे म्हणाले, मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आ. महादेव जानकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कोकणातील जनतेने मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढवावी. मेळाव्यासाठी कोकणातील वेगवेगळ्या परिसरात गाठीभेटी घेऊन मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहोत. कळंबोली, मुंब्रा, पनवेल, करंजी आदी परिसरात बैठका पार पडल्या आहेत. मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई ठाकुर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, राज्य शाखेचे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शरदभाऊ दडस यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment