Monday, February 27, 2023

एड. उमेश पाल यांच्या हत्येचा निषेध करत उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

एड. उमेश पाल यांच्या हत्येचा निषेध करत उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

आरोपींचा पुतळा जाळून निषेध करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

बदायु : आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी बरेली मंडल राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांनी स्व. आमदार राजू पाल यांच्या हत्येतील मुख्य साक्षीदार एड. उमेश पाल व त्यांचे दोन सुरक्षा रक्षक यांच्यावर २४ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे खुलेआम गोळीबार करून हत्या करण्यात आल्याच्या निषेध करून बदायु मालवीय आवास येथे रासप कार्यकर्तेनी एकत्र येत शोक संवेदना व्यक्त केली. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्ष समर्थकांनी आक्रमक होत हत्याकांडातील मुख्य आरोपी अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांचे पुतळे जाळून तीव्र असंतोष प्रकट करत बदायु येथील मुख्य चौकात एक तास रस्ता रोखून धरत चक्काजाम करण्यात आला. 

रासपने बदायु जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की, मुख्य आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळून फाशीची शिक्षा द्यावी, तसे न झाल्यास उत्तर प्रदेशात राज्यभर राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून चक्काजाम करू. रासप बदायु मंडल अध्यक्ष एड. जितेंद्र सिंह पाल म्हणाले, शासन प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास रासप पार्टी वकील टीम व अन्य वकिलांच्या साथीने प्रशासनिक कार्यात अडथळा निर्माण करेल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव बदन पाल भैय्या, बदायु जिल्हाध्यक्ष मुनेंद्र सिंह, बरेली सरचिटणीस लटुरी लाल पाल, बार असोसिएशनचे एड. राजेंद्र बघेल, राकेश बघेल, प्रेम सिंह फौजी, संतोष पाल, नरेंद्र मोहन पाल, विवेक पाल, गेंदालाल बघेल, मोरध्वज बघेल, अन्य शेकडो रासप समर्थक उपस्थित होते.

|प्रा. आबासो पुकळे, मुंबई.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025