Wednesday, February 8, 2023

हजारो रिक्षांसह रासपच्या कोकण मेळाव्यास मुंब्रा रिक्षा चालक-मालक संघटना हजेरी लावेल : सय्यदभाई

हजारो रिक्षांसह रासपच्या कोकण मेळाव्यास मुंब्रा रिक्षा चालक-मालक संघटना हजेरी लावेल : सय्यदभाई

मुंब्रा : यशवंत नायक ब्यूरो 

रायगड मधील पनवेल येथे, दिनांक २१/०२/२०२३ रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या होणाऱ्या सभे संदर्भात, आज दिनांक ७/२/२०२३ रोजी मुंब्रा येथे रिक्षा चालक-मालक  संघटनेसोबत पुर्व नियोजन बाबतीत मिटींग पार पडली.पनवेल येथील सभेला सदर संघटना हजारो रिक्षांसह सहभागी होणार आहेत, असे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष सय्यदभाई यांनी केले आहे. यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष भगवानजी ढेबे साहेब, रायगड महिला आघाडी अध्यक्षा मणिषाताई ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेशभाई भगत साहेब, मुंब्रा रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष  सय्यदभाई व शेकडो रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...