चंद्रपुरात राष्ट्रीय समाज पक्षाचे आढावा बैठक संपन्न
चंद्रपूर : येथे आज दिनांक 28/ 02/ 2023 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील सर खास उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते विदर्भ सचिव संजय कन्नवर यांच्यासह जिल्हाभरातून राष्ट्रीय समाज पक्षाचे जुने नवे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात यावेळी काही नवनियुक्त पदाधिकारी नियुक्त करून राष्ट्रीय समाज पक्षाचा चंद्रपूर जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक विस्तार करण्यात आला. आगामी निवडणुकीत कोणासोबत युती आघाडी न करता पक्ष स्वतःच्या ताकतीवर निवडणुकीला सामोरे जाईल.
No comments:
Post a Comment