राष्ट्रीय समाज पक्ष नाशिक जिल्हा पदाधिकारी बैठक उत्सहात संपन्न; नाशिक जिल्ह्यात मार्चमध्ये भव्य मेळावा घेणार
नाशिक : दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष, नाशिक जिल्हा मुख्य पदाधिकारी यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश सचिव राजाभाऊ पोथारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल तेजल येथील हॉलमध्ये घेण्यात आली. बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख कैलासभाऊ हाळनोर, संजय पाल, नाशिक जिल्हाअध्यक्ष डाॅ. अरुण आव्हाड, नाशिक शहराध्यक्ष विलास पलंगे, युवक जिल्हाअध्यक्ष नवनाथ शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक भागवत सापनर, ज्येष्ठ नेते अरुणभाऊ शिंदे, अल्पसंख्यांक जिल्हाअध्यक्ष समशेद खान, ग्रामीण जिल्हाअध्यक्ष मनोज लाड, नाना मोगरे, अरुण वाजे, उपजिल्हाध्यक्ष विजय शिंदे, ज्ञानेश्वर पारखे, तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर बिडगर, रमेश घुगे, उपशहराध्यक्ष खुशीराम पाल, तालुका सरचिटणीस श्री. पारखे, अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष शादाब खान, प्रसिद्धी प्रमुख संतोष मासुळे आदी उपस्थित होते.
श्री.धिरज पाटील यांची युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. सर्व पदाधिकारी यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकरसाहेब यांचा वाढदिवस नाशिक शहरात अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त करून, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून करण्यात यावा, अशी एकमताने ठरवण्यात आले. तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत, आपले उमेदवार देऊन ते कसे विजयी करता येईल, यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच पक्ष संघटन मजबूत करून, सदस्य संख्या वाढवण्यासाठी अतोनात प्रयत्न करू असा विश्वास दर्शवला.
नाशिक जिल्हातील प्रत्येक पदाधिकारी पक्षासाठी तळमळीने काम करण्यासाठी कटिबंध आहे. प्रत्येक कार्यकर्ता अतिशय निष्ठावंत व पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. यापुढेही असेच काम करतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश सचिव राजाभाऊ पोथारे, डॉ. अरुण आव्हाड यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्वच पदाधिकारी यांनी विविध सुचना केल्या. शहराध्यक्ष विलास पलंगे यांनी पक्षाच्या प्रसिद्धीसाठी आपल्याकडे असलेल्या वाहनावर पक्षाचे व नाव प्रत्येकाने टाकावे अशी सूचना केली, त्यावर सर्व पदाधिकारी यांनी त्या सुचनेस अनुमती दिली. अध्यक्षीय भाषण राजाभाऊ पोथारे यांनी केले. श्री अरुण वाजे व नवनाथ शिंदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यात वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमवेत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment