Wednesday, February 15, 2023

फोडणे, वापरणे, सोडणे हे भाजपचे धोरण : रासपचे महादेव जानकर यांचे टीकास्त्र

फोडणे, वापरणे, सोडणे हे भाजपचे धोरण : रासपचे महादेव जानकर यांचे टीकास्त्र 

येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका

करमाळा : यशवंत नायक ब्यूरो

आमदार खासदार हे फोडणे, वापरणे,  सोडून देणे हे भाजपचे धोरण असून हे जास्त काळ टिकणार नाही, असे टीकास्त्र राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.

करमाळा येथे श्री. जानकर यांनी पक्षाची आढावा बैठकी घेतली. या बैठकीत रासपच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी घारगाव येथील जीवन उगले तर तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे व राजू ठोंबरे यांची तर महिला तालुकाध्यक्षपदी शारदा सुतार व अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी जहांगीर पठाण, पाढे जिल्हा परिषद गटप्रमुख अप्पा पांढरे यांच्या निवड झाली आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प्रभारी परमेश्वर पुजारी, जिल्हा उपाध्यक्ष गोरख वाकडे, जिल्हा सरचिटणीस आनंद देवकाते यांनी मनोगत व्यक्त केले. 

पुढे श्री.जानकर म्हणाले, मी मंत्री असताना सर्वाधिक दूधाला दर दिला. आपण कष्ट करतो आणि फळं दूसरीच खात्यात. काँग्रस व भाजप दोन्ही पक्ष बहुजनांचे नाहीत. येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजेत. त्यासाठी वन बूथ टेन युथची संकल्पना घेऊन गट - गण प्रमुखांची नेमणूक करावी. सर्व समाजाला सोबत घेऊन गावागावात कार्यकर्ता जोडला पाहिजे. गाव तिथे शाखा तसेच विविध प्रकारच्या सर्व आघाड्या स्थापन कराव्यात. काँग्रेस भाजपची धोरणे वेगळे आहेत. रासपच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये मिसळून काम करावे, असेही यावेळी जानकर यांनी सांगितले. 


आम्हाला विचारल्याशिवाय पुढचा मुख्यमंत्री नाही

जिसकी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी, या धोरणानुसार पक्षाची वाटचाल सुरू आहे. 'रासप'चा मुख्यमंत्री व पंतप्रधान कसा होईल. हे धोरण ठरवून आम्हाला विचारल्याशिवाय राज्याचा पुढचा मुख्यमंत्री बनणार नाही असा बंदोबस्त करू, असे विधान महादेव जानकर यांनी यावेळी  केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...