Sunday, February 26, 2023

शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करा : कराड, पाटण तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन

शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करा : कराड तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन 

कराड तहसीलदार यांना निवेदन सादर करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप धुमाळ व अन्य.

पाटण तहसीलदार यांना निवेदन सादर करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पदधिकारी

कराड/ पाटण : यशवंत नायक ब्यूरो 

शेतकऱ्यांचे थकीत विज बिल माफ करून, शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे त्वरित वीज कनेक्शन जोडावे, या मागणीचे निवेदन कराड व पाटण येथे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, लोकसभा अध्यक्ष मा.उमेश चव्हाण, डॉ. रमाकांत साठे सातारा जिल्हा सरचिटणीस, रवींद्र भिसे, आदित्य ठोंबरे, शिवाजी रणदिवे, कराड तालुकाध्यक्ष सविताताई कणसे, कोरेगाव तालुका अध्यक्ष गीताताई जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीकांत देवकर म्हणाले, माननीय मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी तात्काळ या विषयी बैठक बोलावून, निर्णय करावा. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025