देशातील सर्व प्रादेशिक पक्ष अधिक मजबूत झाले पाहिजेत : महादेव जानकर
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन विधानसभा आणि लोकसभेत पाठवावे
पुणे : (२७/०१/२०२३) यशवंत नायक ब्यूरो
राष्ट्रीय पक्षांना तळागाळातील प्रश्न समजण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी फार वेळ लागतो. त्याऐवजी प्रादेशिक पक्षातील, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन, विधानसभा आणि लोकसभेत पाठवले पाहिजे. देशातील प्रादेशिक पक्ष मजबूत झाले, तरच या देशातील लोकशाही अधिक बळकटपणे टिकुन राहू शकेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफि इन्स्टिट्यूटतर्फे आयोजीत ६ व्या युवा संसदेचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. जानकर बोलत होते. संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष एड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे, इम्तियाज जलील आणि रामदास तडस यांना आदर्श खासदार पुरस्कार, नगरसेवक वसंत मोरे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने महादेव जानकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
महादेव जानकर पुढे म्हणाले, पैसा आणि घराणेशाही नसली तरीही, सर्वसामान्य माणूस राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो, हा आत्मविश्वास युवा संसद सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये निर्माण होतो. तरुणच या देशाचे उज्वल भविष्य घडविणार आहे. उडान या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
No comments:
Post a Comment