राष्ट्रीय समाज पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी संजय दिवसे यांची नियुक्ती
यवतमाळ जिल्हा रासप आढावा बैठकित बोलताना मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, बाजूस प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व अन्य. |
2024 च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात सत्ता स्थापनेच्या निर्णय प्रक्रियेत असणार आहे. त्या दृष्टीने रासप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. विदर्भ ही राजकीय दृष्ट्या सुपीक जमीन आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याची तयारी ठेवावी, असेही काशिनाथ नाना शेवते म्हणाले. बैठकीला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संजय दिवसे, विलास काळे, प्रफुल खेडकर, ज्ञानेश्वर रायमल, जितेंद्र खाटीक, सुनील लोखंडे आदी रासप समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर येथील डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या संकल्पनेतून आणि योगदानातून उभारलेल्या महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाला राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विलासजी काळे यांनी स्वागत केले. यावेळी श्री. काळे यांनी विद्यापीठाची संकल्पना स्पष्ट केली. १८ ते ३० वयोगटातील तरूण, तरूणींना सत्यशोधक विचारांचा, फुले वादाचा प्रचार प्रसार करण्यासाठी अभ्यास करण्याकरिता मोफत शिबीर आयोजित केले जाते. तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. अतिशय स्तुत्य उपक्रम ज्याची नितांत गरज आहे असे कार्य याठिकाणी सुरू आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांनी मांडले.
No comments:
Post a Comment