Friday, February 24, 2023

शहा मोदींकडून मित्रपक्षांना धोका देण्याचे आणि संपवण्याचे काम : सिद्धप्पा अक्कीसागर

शहा मोदींकडून मित्रपक्षांना धोका देण्याचे आणि संपवण्याचे काम : सिद्धप्पा अक्कीसागर

मुंबई : भाजपचे एकेकाळचे मित्र पक्ष असलेल्या रासप नेते महादेव जानकर यांच्या पनवेल येथील 'भाजप पासून सावध राहण्या'च्या विधानावरून देश व राज्याच्या समाज राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यातूनच पक्ष तावून सुलाखून निघेल, असा विश्वास एस. एल. अक्कीसागर यांनी यशवंत नायक जवळ व्यक्त केला.

श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले,  24 पक्षाची साथ घेत अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार चालविले होते, शहा मोदी यांनी सुरुवातीपासूनच मतलब साधल्यानंतर मित्र पक्षांना धोका देण्याचे आणि संपविण्याचे काम केले. रासपाला देखील धोका दिला. युतीचा धर्म पाळण्यासाठी त्याही अवस्थेत मैत्री धर्म रासपा अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी पाळला, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाळला.  बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्यामुळेच पूर्वी आरएसएस प्रणित जनसंघाची पणती-दीप पेटले आणि भाजपचे कमळ फुलले, हे त्रिकालाबाधित सत्य कोणालाच नाकारता येत नाही. याची जाण असणारे आणि त्याचा आदर कदर करणारे तो वकुब आणि मोठेपणा असणारे स्व प्रमोद महाजन आणि स्व गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते आता भाजपात उरलेले नाहीत. आरएसएस पितामह धृतराष्ट्र बनले आहे. लोकशाही जनतंत्र धोक्यात आहे. देशाचे कुरुक्षेत्र होवू पहात आहे. 

काँग्रेस व भाजप सारख्या मोठ्या पक्षापासून सावध राहण्याचे मा. महादेवजी जानकर यांचे  विधान खूप महत्वाचे आहे.

3 comments:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...