रासेफचा यशवंत गौरव सन्मान २०२३ सोहळा थाटामाटात; शून्य ते शिखर पर्यंत प्रवास करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
यशवंत गौरव सोहळ्याप्रसंगी मान्यवर |
देव, धर्माचा आधार घेऊन देश आणि समाज विभाजित करण्याचे काम : श्री सिद्धारामनंद स्वामी
देशातील बहुसंख्य जाती जमाती वर्गाला, आजही न्याय मिळालेला नाही: माजी न्यायमूर्ती व्ही ईश्वरय्या
मुंबई |प्रा. आबासो पुकळे, उपसंपादक यशवंत नायक : दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशन तर्फे यशवंत गौरव सन्मान २०२३ सोहळा थाटामाटात उत्सहात पार पडला. सोहळ्याचे आयोजन वालचंद हिराचंद हॉल, आयएमसी बिल्डिंग, आयएमसी रोड, चर्चगेट, मुंबई येथे करण्यात आले होते.
शून्य ते शिखर पर्यंत प्रवास करून यशाचे अंतिम ध्येय गाठनाऱ्या यशस्वी व्यक्तींना श्री कनक गुरुपीठ कागीनेली धर्मपीठाच्या तीथनी ब्रिज कर्नाटकचे श्री सिद्धारामनंद स्वामीजी व न्यायाधीश आंध्रप्रदेश उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही ईश्वरय्या, रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रासेफचे पॅट्रॉन - परामर्षदाता माजी आमदार महादेव जानकर कॅबीनेटमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री कुमार सुशील यांनी प्रास्तविक केले. राष्ट्रीय समाज यशवंत गौरव पुरस्कार याचे आगळे वेगळे महत्व मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक बहिष्कृत भारत जनता समता प्रबुद्ध भारत ते महादेव जानकर यांच्या यशवंत नायक पर्यंतचा प्रवास सांगितला. होळकर यशवंतराव ते महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर सुपुत्र यशवंत तसेच यशवंत राजर्षी शाहूराजे यशवंत नायकने प्रवास सांगितला. "देव, धर्म याचा आधार घेऊन देश आणि समाज विभाजित करण्याचे काम केले जात आहे, यापासून सावध राहण्याचा" सल्ला कागीनेली कनकपिठाचे स्वामी श्री सिद्धरामानंद स्वामी यांनी यावेळी दिला. देशातील बहुसंख्य असलेल्या जाती जमाती वर्गाला, आजही न्याय मिळालेला नसल्याबद्दल न्यायमूर्ती व्ही ईश्वरय्या यांनी खेद व्यक्त केला. जोपर्यंत समजातील सुशिक्षित जागृत वर्ग, पुढे येऊन समाजकारण आणि राजकारण यात सक्रिय योगदान देणार नाहीत, तोपर्यंत देश आणि देशातील जनतेचा खरा विकास होणार नाही, असे मत कार्यक्रम अध्यक्ष श्री एस. एल अक्कीसागर यांनी याप्रसंगी मांडले.
आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय, राजकारण, पत्रकार, वैद्यकीय, साहित्य, उद्योग, कला, क्रीडा आदी क्षेत्रामध्ये शून्यातून सुरुवात केली अशा, अंखड भारत देशातील लोकांचा शाल, ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यात १) दिलीप ढोले- मीरा भायंदर महानगरपालिका आयुक्त एवं प्रशासक महाराष्ट्र २) ललिता बाबर - भारतीय एथलेटिक्स रेल्वे ३) श्रीमती संगीता धायगुडे - भूतपूर्व मनपा आयुक्त धुळे, महाराष्ट्र ४) ए. एस अंकलगी - कार्यकारी अभियंता म्हाडा, महाराष्ट्र ५) डॉ. नरेशचंद्र कथोले - मिशन आईएएस ६) संदीप सिद्दप्पा राजगोलकर - पत्रकार TV9 न्यूज नवी दिल्ली ७) संपत मोरे- स्तंभकार, लेखक ८) रामकुमार पाल - उद्योजक मुंबई ९) जी करुणानिधि - महासचिव ओल इंडिया फेडरेशन ऑफ ओबीसी असोसिएशनस तमिळनाडु १०) घनश्याम येडे - फिल्म निर्माता व निर्देशक बारामती ११) संतोष खांडेकर - मुख्याधिकारी जालना, महाराष्ट्र १२) भगतसिंह बघेल- सीएमडी भावना ग्रुप आगरा, उत्तर प्रदेश १४) गौरीशंकर चौबे - युवा उद्योजक मुंबई १५) राकेश पाल - पूर्व जिला पंचायत अध्यक्ष झांसी, उत्तर प्रदेश १५) सतीश पाल- समाजसेवी राजनीतिज्ञ कानपुर १६) एड. कृष्ण कन्हया पाल - इलाहाबाद हाईकोर्ट १७) विवेक गुप्ता - सेवा विवेक फाउंडेशन १८) राजदेव पाल- एमडी पालेक्स लॉजिस्टिक्स १९) आशीष सिंह - प्रोटोकॉल कमिश्नर दिल्ली २०) नरेंद्र तराले- निर्देशक ई गवर्नेंस आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. श्रीमती संगीता धायगुडे, क्रीडापटू ललिता बाबर, एड के के पाल, सतीश पाल यांनी आपला खडतर परंतु यशस्वी प्रवास समोर मांडला. माजी मंत्री आ. महादेव जानकर हे रासेफ आयोजित या अराजकीय कार्यक्रमास उपस्थित राहिले, परंतु मंचकावर विराजमान झाले नाहीत. मुख्य अतिथी म्हणून ते म्हणाले, समाजातील प्रबुद्ध वर्गामुळेच शासन - प्रशासन स्थिर व सक्षम राहू शकते. म्हणूनच राजकारण आणि समाजकारण यात सक्रिय व्हावे, म्हणून या कार्यक्रमाचे प्रयोजन होते. आणि त्यामुळेच विविध क्षेत्रातील यशवंत व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, याबद्दल रासेफचे आभार आणि पुरस्कार प्राप्त लोकांचे श्री. जानकर यांनी अभिनंदन केले.
रासेफचा प्रथमच भव्य कार्यक्रम दक्षिण मुंबईत यशस्वी करणात रासेफच्या सर्व पदाधिकारी आणि हितचिंतक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आयोजकाकडून सर्व सन्माननीय पुरस्कार प्राप्त व मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी उद्योजक रामभाई पाल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रासेफचे महाराष्ट्र राज्य सचिव जयसिंगराव राजगे सहित रासेफ महाराष्ट्र पदाधिकारी, सदस्य, भारतीय मिंट कर्मचारी संघटनेचे एन डी घुटुकडे, ओबीसी विचारवंत लेखक श्रावण देवरे, आदिवासी कर्मचारी संघटनेचे घनश्याम पाटील, रिझर्व्ह बॅंक ऑफिसर असोसिएशनच सुधीर वालकर, रिझर्व्ह बॅंकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जी. गोपालकृष्ण डॉ सुरेश पाल, बंडू खडगी, प्रदीप शेराला सहित अनेक बुद्धीजीवी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
No comments:
Post a Comment