सत्तेची ताकद दिल्लीतच; मला लोकसभेत जायच आहे - महादेव जानकर
लातूर : ११/२/२०२३
राज्यातील राजकीय क्षमता अन्न, वस्त्र आणि निवारा भागवण्याची आहे. पण दिल्ली केंद्रातच सत्तेची खरी ताकद असून, मला 'सर्व समान, देश महान' बनवण्यासाठी खासदार व्हायचं आहे. माझ्या पक्षाच्या खासदारांचा केंद्रात दबाव गट बनवायचा आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी लातूर येथे दैनिक भूकंपचे संपादक अशोक चिंचोले यांच्या लातूर येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सध्याची राजकीय परिस्थिती, धनगर समाज आरक्षण आदी बाबत चर्चा झाली. आ. महादेव जानकर यांनी मला कधी आमदार, राज्यात मंत्री व्हायचं नव्हतं, पण मी काही काळासाठी राज्यात मंत्री झालो. संसदीय लोकशाहीत राज्यापेक्षा केंद्र सरकारला अधिक ताकद आहे. 'सर्व समान तो देश महान' हा माझा नार आहे. मी अगोदर तीन वेळा लोकसभा निवडणूक लढलो आहे, पण मला राज्याच्या राजकारणात रस नाही. माझा रासप लवकर राष्ट्रीय पक्ष बनत आहे. आरक्षण असो की, गरिबांचे प्रश्न असो, त्यासाठी दिल्लीची ताकद मोठी आहे. माझ्या पक्षाच्या खासदारांचा एक दबाव गट निर्माण करायचा आहे. मी बारामती, मिर्जापुर, परभणी अथवा माढा लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मी एक दिवस देशाचा पंतप्रधान होणार आहे. आपल्या चौकात, आपली औकात वाढविल्याशिवाय कोणी दात देत नाही. आतापर्यंत जे जे कोणी भाजप काँग्रेसच्या दावणीला बांधले ते संपले. मी जाणीवपूर्वक भाजप सोबत गेलो, पण त्यांचा चिन्ह घेतले नाही. भविष्यात मी भाजप शिवाय इतर पक्षासोबत युती करू शकतो. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावत पक्ष स्थापन करून सुरुवात केली आहे, मी धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न विसरलो नाही. सत्तेत आहेत ते प्रस्थापित पक्ष धनगरांचा आरक्षण प्रश्न सोडवणार नाहीत. धनगर आरक्षण हा प्रश्न सोडवायचा असेल तर, केंद्रात आपल्या पक्षाची ताकद वाढविल्याशिवाय, दबाव गट निर्माण केल्याशिवाय, होणार नाही. आपला पक्ष म्हणून रासपच्या बाजूने राहावे, अशी अपेक्षा महादेव जानकर यांनी व्यक्त केली. आज माझ्या पक्षाचे आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी आहेत, चार राज्यात पक्ष म्हणून मान्यता आहे. भविष्यात भाजप सोबत जाण्याची शक्यता नाहीच हे स्पष्ट केले. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी माझी एक बैठक झाली आहे. मला लोकसभेच्या विधानसभेच्या विशिष्ट जागेवर तडजोड झाली तर, त्यांच्याशी युती झाली तर नवल नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी रासपचे मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार, लातूर जिल्हाध्यक्ष दादा करपे, दत्ता सुरवसे, नारायण यमगर, बाबा भिसे, नामदेव सुळे, राज्यपाल बंडे, शुभम चिंचोले जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment