मुर्तिजापूरात राष्ट्रीय समाज पक्षाची अकोला जिल्हास्तरीय आढावा बैठक यशस्वी
अकोला : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर साहेब यांचे आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांची शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3:00 वा. शासकीय विश्रामगृह मूर्तिजापूर येथे रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते यांचे अध्यक्षतेत आढावा बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील आगामी स्थानिक निवडणुकिच्या बाबतीत पक्षाची रणनीती ठरवण्यात आली. पक्ष संघटन बांधणी मजबूत करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथनाना शेवते, प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील आदी मान्यवरानी बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. अकोला जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांनी पक्षाची आगामी काळात ताकद निर्माण करण्यासाठी, वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे यांनी सांगितले.
याबैठकीत जिल्ह्यातील वामन पाठक, संदीप शिरसाठ, चंदन शिरसाठ, रमेश उगले, बजरंग डांबेराव, गजानन सोळुंखे, सदानंद सोळूंखे, मंगेश मानकर रासप कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment