Wednesday, February 15, 2023

ओबीसी समाजाने सत्तेकडे वाटचाल करावी : महादेव जानकर

ओबीसी समाजाने सत्तेकडे वाटचाल करावी : महादेव जानकर

ओबीसी हक्क परिषद दिल्ली संघटनेचा ओबीसी महामेळावा संपन्न

परभणी (प्रतिनिधी) : ओबीसी समाजाने संघटित होऊन सत्तेच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते आ. महादेव जानकर यांनी केले. परभणीत ओबीसी हक्क परिषद दिल्ली संघटनेच्यावतीने ओबीसी महामेळावा संपन्न झाला. महामेळाव्याची सुरुवात स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. महामेळाव्याचे अध्यक्ष ओबीसी नेते महादेवजी जानकर, माजी कॅबिनेट मंत्री यांचा संघटनेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यात परभणीसह नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली सातारा, बीड, औरंगाबाद, जालना हिंगोली, वाशिम विदर्भ आणि अकोला इत्यादी विभागातून पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्यावतीने सोलापूर येथे मार्च महिन्यामध्ये भव्य महामेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. ओबीसी समाजाचा विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भात ठराव करण्यात आला. सदरील मागण्या केंद्र शासनाकडे मांडून पूर्ण करण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

महामेळाव्यात ओबीसी नेते प्रदीप बाबुराव फाले संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे रंगनाथजी गुरव राष्ट्रीय महासचिव, विश्वनाथ थोरे, अनंत बनसोडे, श्री इनामदार ज्येष्ठ नेते भाजपा, सचिनजी देशमुख, सुभाषजी पांचाळ राष्ट्रीय उपाध्यक्ष, पूजाताई सोनवणे राष्ट्रीय महासचिव, माधवीताई पोद्दार प्रदेश उपाध्यक्ष, सुरेशसिंह परीहार, डॉ गोविंद कामटे राष्ट्रीय उपाध्यक्ष, पुष्पा मुंडे राष्ट्रीय अध्यक्ष महिला, प्रा.अमोल गौतम प्रदेश उपाध्यक्ष, विष्णू बाप्पा पांचाळ जिल्हाध्यक्ष बीड, मोहन पोतदार जिल्हाध्यक्ष लातूर, मनोहर सातपुते प्रदेश महासचिव, सुदर्शन बोराडे प्रदेश कार्याध्यक्ष, अशोक कल्याणकर प्रदेश महासचिव, सचिन बुद्धे प्रदेश सचिव, संगीता पवार प्रदेश महासचिव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...