लहान बालिकेवर अत्याचार प्रकरणी कारवाई करा ; राष्ट्रपतीना रासपचे निवेदन
करेरा मध्य प्रदेश (११/३/२५) : शिवपूरी झाशी महामार्गावरील 50 ते 100 फूट मीटर अंतरावर असणाऱ्या ग्राम आवास येथे एका पाच वर्षे लहान बालीकेवर दुष्कर्म करणाऱ्या अपराधीस शिक्षा करण्यासाठी राष्ट्रीय समाज पार्टीने 11 मार्च मंगळवारी महामहीम राष्ट्रपती व प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्या नावाने पिछोरचे एसडीएम यांना निवेदन दिले. निवेदन देण्यासाठी रासपचे मध्य प्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल, प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट डी एस चव्हाण, प्रदेश कार्यकारी समिती सदस्य मीटनलाल वशंकर, रामकृष्ण विश्वकर्मा, जिल्हा संघटन मंत्री केपी परिहार, पिछोर तालुकाध्यक्ष सोनू पुरोहित, युवक अध्यक्ष सरजील कुरैशी, कल्याण सिंह बघेल, अखिलेश पाल, जिद्दी गडरिया, आनंदपाल, संदीप लोधी, पुष्पेंद्र बघेल सतीश सिंग, ईश्वर चव्हाण, सतपाल कृष्ण कोटरा, आकाश आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment