राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हाध्यक्षपदी अरुणशेठ झिमल, संपर्क प्रमुख बलभीमशेठ सरक
नवी मुंबई (१८/३/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक नवी मुंबई येथे पार पडली. 22 व 23 रोजी खानदेशात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. या अनुषंगाने ही बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्ष पनवेल विभाग रायगड जिल्हाध्यक्षपदी अरुणशेठ झिमल यांची निवड करण्यात आली. श्री. झिमल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे पूर्वाश्रमीचे एकनिष्ट कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी कुर्ला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. "निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. झिमल म्हणाले, या विभागात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन ताकद वाढवण्यासाठी मेहनत घेणार, असल्याचे स्पष्ट केले.
रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी बलभीमशेठ सरक यांची फेर निवड जाहीर करण्यात आली. श्री. सरक यांनी यापूर्वी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत ताकद आजमावली होती. शशिकांत मोरे सरकार यांची पनवेल तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी रासपचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष सुदामशेठ जरग, राज्य कार्यकारणी सदस्य भगवानराव ढेबे, कोकण प्रांत महीला आघाडी नेत्या मनीषाताई ठाकूर, विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र माजी अध्यक्ष शरद दडस, उत्तर रायगड माजी जिल्हाध्यक्ष बळीराम ऐनकर, पनवेल माजी तालुका अध्यक्ष मुकेश भगत, गोरक्षनाथ कोकरे, अण्णासाहेब वावरे, ऋषिकेश जरग, गोरक्षनाथ कोकरे, बाळासाहेब हुलगे, चैतन्य जरग, रावसाहेब अनुसे, अंकुर जरग आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment