कुंभमेळ्यात हरवलेल्या 'सरस्वती'चा रासपमुळे कर्नाटकच्या कुटुंबियाना सुगावा
#prayagraj #kumbhmela #प्रयागराज #कुंभमेळा #mirjapur #karnataka #anilkumar #slakkisagar #RSPs #bidar #लापता #ajji #grandmother #Kannad #hindi
मुंबई : राष्ट्रभारती
गंगा, जमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम प्रयागराज येथे आहे, असे सांगितले जाते. गंगा, जमुना नद्या अस्तित्वात आहेत, मात्र सरस्वती नदी लुप्त आहे. प्रयागराजच्या कुंभमेळाव्यात कर्नाटकच्या सरस्वती आज्जी आपल्या कुटुंबीयांसोबत आल्या होत्या. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी त्या गर्दीत त्रिवेणी संगम परिसरात हरवल्या. चार पाच दिवस सरस्वती आज्जीचा शोध घेतल्यानंतर कुटुंबीय थकले होते. आज्जी मिर्जापूर येथील बरकछ गावात पोहचल्या. तिथे त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल कुमार यांनी आश्रय दिला. आज्जीना कन्नड भाषा येत होती. त्यांना इतर भाषा अवगत नव्हत्या, त्यामूळे त्यांच्याशी संवाद साधने अवघड झाले होते. रासपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्याशी आजींचे कन्नडमध्ये बोलणे अनिलकुमार यांनी करून दिले. पुढे त्यांची ओळख पटली आणि त्यांच्या कुटुंबीयाशी संपर्क साधला गेला. प्रयगराजच्या त्रिवेणी संगमावर लुप्त सरस्वती नदीप्रमाणे बघता बघता नजरेआड झालेल्या सरस्वती आज्जींचा राष्ट्रीय समाज पक्षामुळे कर्नाटकच्या कुटुंबियांना सुगावा लागला आणि कुटुंबियांना आनंद झाला. आज आज्जीना साडी चोळी, चप्पल देऊन माहेर करण्यात आले, अशी माहिती सुनील टायगर यांनी दिली. त्यांच्या कुटुंबियांनी गावकऱ्यांचे आभार मानले व काशी विश्वनाथ दर्शनसाठी आज्जीसह कुटुंब रवाना झाले. सदर कामगिरी बद्दल रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मिर्जापूर रासप टीमचे अभिनंदन केले. सदर घटनेचे वार्तांकन उत्तर प्रदेशच्या स्थानिक वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केले आहे.
No comments:
Post a Comment