यवतमाळ येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू
यवतमाळ(२/३/२५) : राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक विश्रामगृह यवतमाळ येथे दुपारी २ वाजता पार पडली. या बैठकीला प्रमुख उपस्थिती विदर्भ माजी सचिव गणेश मानकर हजर होते. बैठकीचे अध्यक्षस्थानी प्रदेश सदस्य नानासाहेब देशमुख होते. बैठकीमध्ये गणेश मानकर यांनी पक्षाचे ध्येय धोरण व पक्षश्रेष्ठीचे आदेश सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मान्य करावे, असे सांगितले. प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून सुरेश ठाकूर यांना करण्यात आले. स्वप्निल देशमुख यांना युवक जिल्हाध्यक्ष प्रभारी करण्यात आले. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली. गणेश मानकर व नानासाहेब देशमुख यांनी ठणकावून सांगितले की, या वेळेस आपल्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्या पद्धतीने काम चालू करा व जे काम केले आहे, त्याचा अहवाल वरिष्ठांना कळवत चला व येणारे एका महिन्यात तुमच्या जिल्ह्याची कार्यकारणी तालुका बांधणी पूर्ण करून यादी पाठवा. शुभम, सुभाष भाऊ, जय महाले व इतर कार्यकर्ते हजर होते. बैठकीस कार्यकर्ते चांगल्या संख्येने हजर होते.
No comments:
Post a Comment