महाशिवरात्री निमीत्त महादेव जानकर यांच्याकडून महाबळेश्वर तालुक्यातील अनेक शिवमंदिरात शिवपूजा व आरती
महाबळेश्वर : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्रीमहादेव जानकर यांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२:०० वाजता महाबळेश्वर येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने पूजा व आरती करून उत्सवाची सुरुवात केली. पुजारी नाना वाडकर व इतर सर्व महंत पुजारी यांच्या मंत्रोच्चार मध्ये विधी पार पडला. यावेळी परिसरातील शेकडो भक्तगण उपस्थित होते. श्री. जानकर यांच्यासमवेत रासपचे राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, विनोद हातनोलकर, हरेश ढेबे, करण ढेबे, श्याम सूर्यवंशी, जय ढेबे, चंद्रकांत होगाडे, विजय ढेबे, संदेश होगाडे, संजय शिंदे आणि इतर पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक प्रदीप कात्रट, प्रशांत कात्रट इत्यादी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाबळेश्वरचे शिवमंदिर हे ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थान आहे. इतिहासानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरात त्यांच्या मातोश्री यांची सुवर्णतुला केली होती. ही घटना ६ जानेवारी १६६५ रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी घडली होती. आजच्या तारखेप्रमाणे, या ऐतिहासिक घटनेला ३६० वर्षे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या या उपक्रमामुळे स्थानिक भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दिनांक 25 व 26 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी महाबळेश्वर दौऱ्यात श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर, रुळे येथील बाजी कुसुंबेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मोळेश्वर शिवमंदिर आदी मंदिरात दर्शन घेतले, मंदिर परिसर विकासासाठी सहकार्य करणार असे सांगितले.
No comments:
Post a Comment