रासपचे सातारा शहर जिल्हा पदाधिकारी नियुक्त
सातारा (१३/३/२५) : राष्ट्रीय समाज पक्ष सातारा शहर जिल्हा आढावा बैठक व पदनियुक्तीचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या उपस्थितीत सोमण सभागृहात पार पडला. पुढीलप्रमाणे सातारा शहर व जिल्हा पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. डॉ. रमाकांत माधव साठे - जिल्हाध्यक्ष सातारा (पश्चिम विभाग ), उमेशभाऊ चव्हाण - अध्यक्ष सातारा लोकसभा, किरण मोहन माने - जिल्हा संघटक सातारा( पश्चिम विभाग), सतीश आनंदा कांबळे - जिल्हा सरचिटणीस सातारा( पश्चिम विभाग), महेश अशोक वायदंडे - शहराध्यक्ष सातारा यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीमती सुनिता ताई किरवे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब वाघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरणजी गोफणे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक (मामा) रुपनवर, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेरावजी सरक, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर( काका) खरात, सातारा जिल्हा माजी महिला अध्यक्ष पूजाताई घाडगे, पुणे जिल्हाध्यक्ष तानाजीशेठ शिंगाडे, पुणे शहर महिला अध्यक्ष वैशाली जाधव, निलेश लांडगे, ऋषिकेश बिचुकले, विमल ताई शिंदे, सविता कणसे, रीना भोसले आदी उपस्तिथ होते.
No comments:
Post a Comment