अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारणी जाहीर
नाशिक (२/३/२५) : भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राज्यासह देशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची ताकद अधिक वाढवण्यासाठी समता परिषदेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे. राज्यातील सर्व ओबीसींचे संघटन करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासाठी परिषदेला श्री. भुजबळ यांनी आवाहन केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली असून यांसह कार्यकारणी मध्ये एकूण ३२ पदाधिकाऱ्यांचा प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश चिटणीस, प्रदेश संघटक, प्रदेश प्रचारक यांचा समावेश आहे.
यावेळी कार्यकारिणीमध्ये प्रदेश सरचिटणीस पदी मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते श्री.शब्बीर अन्सारी, तेली समाजाचे नेते ईश्वर बाळबुधे, दिलीप खैरे, वंजारी समाजाचे नेते सत्संग मुंडे, सुभाष राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी भटक्या विमुक्त समाजाचे नेते जी.जी.चव्हाण, माजी आमदार पांडुरंग अभंग, शंकरराव लिंगे, डॉ.कैलास कमोद, मराठा समाजाचे नेते शिवाजीराव नलावडे, सौ.पार्वतीताई शिरसाठ, अंबादास गारुडकर, कुणबी समाजाचे नेते प्रा.दिवाकर गमे, दलित समाजाचे नेते बाळासाहेब कर्डक, ॲड.राजेंद्र महाडोळे, लोणारी समाजाचे नेते डॉ. सुदर्शन घेराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश चिटणीसपदी डॉ.गणेश खारकर, किशोर कन्हेरे, डॉ.डी.एन. महाजन, विणकर समाजाचे नेते सुनील मेटे, समाधान जेजुरकर, नाभिक समाजाचे नेते अनिल निकम, धनगर समाजाच्या नेत्या डॉ. स्नेहा सोनकाटे, ओबीसी समाजाचे नेते कैलास मुदलीयार, प्रदेश संघटकपदी प्रा.रवींद्र खरात तर प्रदेश प्रचारकपदी डॉ. नागेश गवळी, प्रा. संतोष विरकर, ढोर समाजाचे नेते मुकुंद सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस छगनराव भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या!
No comments:
Post a Comment