Sunday, December 31, 2023

"वोट बँक" प्रस्थापित पक्ष सोडून "रासप" कडे वळवण्यास काय हरकत आहे

धनगरांनो निवडणुकी पूर्वी "आरक्षण" मिळाले नाही तर समाजाची "वोट बँक" प्रस्थापित पक्ष सोडून "रासप" कडे वळवण्यास काय हरकत आहे....

    ✍️✍️रोख ठोक✍️✍️

      अशोक पातोंड धनगर

      अकोट जिल्हा अकोला

         9881667678

🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭🪭

भाजप, काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी या सर्वच प्रस्थापित पक्षांनी गेल्या 70 वर्षात आमच्या धनगर समाजाचा केवळ "वोट बँक" आणि सतरंज्या उचलण्यापुरताच उपयोग घेतला. राज्यात वरील चारही पक्षांचे सरकारे आलीत आणि गेलीत. मात्र आमचा "धनगर ST आरक्षणा"चा प्रश्न काही सुटला नाही. जो पक्ष सत्तेवर येतोय तो केवळ आमच्या जमातीला धतूराच दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न केल्या गेला. तरीही आम्ही त्यापासून बोध काही घेतला नाही. सात पिढ्या आमच्या बरबाद झाल्यावरही आमचा समाज जाती सोबत माती खायला तयारच नाही. उलट प्रस्थापित पक्षांच्या आहारी जाऊन आम्ही एकमेकांच्या आपसातच तंगड्या ओढायला लागलो. प्रस्थापित पक्षांचे मात्र त्यातून चांग भलंच झालं. कुठेतरी हे थांबले पाहिजे आणि यापुढील काळात निदान जातीसाठी सर्वांनी पाणीदार बनणे गरजेचे आहे, असे माझे मत आहे.

        बांधवांनो सांगायचे म्हणजे काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी असो की, शिवसेना हे सर्वच प्रस्थापित पक्ष आमच्या फुटीचा पुरेपूर फायदा घेऊन समाजात "तोडा आणि फोडाची" नीती वापरून आम्हाला कामापुरते वापरू लागलेत. हे मात्र आमच्या कुठल्याच धनगर नेत्यांच्या वा कार्यकर्त्यांच्या 70 वर्षात लक्षात आले नाही. आणि येणार पण नाही. कारण आमच्या जमातीला जी 70 वर्षाची लाचारी व गुलामी करण्याची सवय लागलेली आहे. ती मला वाटते एकदाचे स्मशानात गेल्याशिवाय तर काही सुटणे नाही. आमच्या जमातीची अवस्था आज रोजी अशी झाली की, गाढवाला 🫏त्याच्या मालकाने कितीही सुधारण्याचे प्रयत्न केले, तरी तो त्याच्या वागणुकीत बदल करण्याचे नाव घेत नाही. भर उन्हाळ्यात मातीत लोळल्याशिवाय गाढवाला 🫏जसे समाधान होत नाही. तसेच आमच्या जमातीला 70 वर्ष प्रबोधनकारांनी प्रकाश टाकण्याचे काम केल्यावरही आमच्या लोकांच्या मेंदूत फरक पडला नाही. मी तर म्हणेल आमच्या जमातीच्या लोकांचे खरोखर डोकी ठिकाणावर असती तर 70 वर्ष आमच्या हातून व्यर्थ वाया गेलेच नसते. मी तर म्हणेल की, आमची जमात हल्ली "सुखी जरूर असेल पण सुती" अजिबातच नाही. म्हणून हा सर्व घोळ आहे.

    बांधवांनो असे म्हणतात की, आमच्या पेक्षा मेंढरं 🐑🐑तरी बरी. कमीत कमी रस्त्याने चालतांना ते सरळ रेषेत तरी चालतात. मात्र आमच्या जमातीतील लोकांना डोकं असल्यावरही डोक्याचा योग्य वापर जमातीसाठी करीत नाहीत. हे खूप मोठे दुर्दैव आमच्या जमातीचे आहे.

       बांधवांनो गेल्या 70 वर्षात आपण काँग्रेस, भाजप, सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व प्रस्थापित पक्षांना अजमावले असून यापैकी एकाही राजकीय पक्षांनी आमच्या जमातीसाठी "आरक्षण"च काय तर कुठलेच सामाजिक प्रश्न सोडविले नाही. तरीही आम्ही वरील सर्व पक्षांसाठी मागचा पुढचा विचार न करता 70 वर्ष चपला झिजवल्यात. आमच्या हाती काय लागले तर केवळ धतूरा.... मग आता तरी आमच्या जमातीने सुधरायला नको का...?? वागणुकीत बदल करायला नको का...?? जमातीसाठी माती खाणार की नाही...?? समाजासाठी पाणीदार बनून लाचारी व गुलामीचा अंत करणार की नाही....?? त्यासाठी एकच करावं लागेल. वरील सर्व प्रस्थापित राजकीय पक्षांना येणाऱ्या निवडणुकीत एकाही धनगराने मतदान न करता आमच्या हक्काचा आणि घरचा पक्ष, "राष्ट्रीय समाज पक्ष" याच पक्षाला मतदान करून महादेवराव जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यास काही हरकत नाही. जेणेकरून प्रस्थस्पित पक्षांना यातून धडा मिळेल आणि महत्वाचे म्हणजे आमच्या धनगर जमातीची "वोट बँक" सुद्धा यातून प्रस्थापितांना कळेल. आमची "वोट बँक" पक्की असली तर पुढील काळात प्रस्थापित राजकीय पक्ष भविष्यात आमच्या जमातीचा विचार तरी करतील. म्हणून माझी हात जोडून तमाम धनगरांना नम्र विनंती आहे की, आपापसात असलेले मान-पान, रुसवे-फुगवे, पक्ष, संघटना, गट-तट विसरून गेल्या 70 वर्षांचा हिशोब प्रस्थापित पक्षांकडून घेण्यासाठी तयारी ठेवा. हीच अपेक्षा करतो.

धन्यवाद.

🪷🙏🏾

जेजुरी गडावर दर्शन आणि बरेच काही

 जेजुरी गडावर दर्शन आणि बरेच काही...


२६, २७ नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांनी मिशन मौर्य क्रांती महासंघाचे अधिवेशन जेजुरी येथे उपस्थिती लावली. उत्सहात अधिवेशन पार पडले.  दिनांक 26 रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत मान्यवर पोहचले. २७ रोजी पहाटे जेजुरी गडावर पायी प्रवास करीत दोन बुजुर्ग व तरुण तुर्क गेले व महानायक खंडोबा देवास या देशावर राष्ट्रीय समाज पक्षाचे शासन यावे व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांना दिल्लीत खासदार म्हणून धाडावे, असा नवस केला. जेजुरीत काही मान्यवर लोकांच्या भेटी गाठी झाल्या. अधिवेशनात खास उपस्थित राहिलेले प्रबोधनकार गोविंदराव शुरनर, सतिश नझरकर सर, अशोक गाडे सर, सुदर्शन अक्कीसागर. मावळ लोकसभा, पुणे लोकसभा, बारामती लोकसभा, सातारा लोकसभा असा प्रवास करत एस एल अक्कीसागर साहेब हे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे नव्या दमाचे शिलेदार श्री. शरदभाऊ दडस यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास उपस्थित राहिले. तसेच वधू वरास शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेतल्या. बर्थडे विश्वाचा यशवंत नायक प्रतिनिधी सह मुंबई पर्यंत प्रवास करून बेळगाव कर्नाटक दौऱ्यावर रवाना झाले. तसेच जेजुरीतून नजरकर सर, शुरणर साहेब, गाडे सर हे मराठवाड्याच्या दिशेने रवाना झाले.









































राष्ट्रीय समाज पक्ष हरियाणा प्रदेश अध्यक्षपदी श्री. भगवान यांची नियुक्ती

राष्ट्रीय समाज पक्ष हरियाणा प्रदेश अध्यक्षपदी श्री. भगवान यांची नियुक्ती

चरखी दादरी : हरियाणा राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी श्री. भगवान यांची नियुक्ती महादेव जानकर यांनी केली. प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यावर श्री. भगवान यांनी प्रदेश कार्यकारणी गठित करत उपाध्यक्षपदी आशिष कुमार, पवन कुमार, बलवान गोठवाल, महासचिवपदी प्रवीण कुमार, सचिवपदी सतबिर पूनिया, पूर्ण सिंह, सोनू सातोर, संघटन सचिव सुरत सिंह, धर्मवीर सिंह, संघटन महासचिव सुरेंद्र सिंह, हरिओम जांगडा, अमित वर्मा, आकाश इंदौरा, रमनिवास मायना, मुकेश सोनी, महामंत्री कृष्ण प्रजापती, दीपक सुरगढ, प्रदीप मोरावाला यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन लढेल.

रासप हायकमाड समवेत विदर्भ रासप पदाधिकारी बैठक

रासप हायकमाड समवेत विदर्भ रासप पदाधिकारी बैठक


नागपूर : (७/१२/२३) यशवंत नायक ब्यूरो

नागपूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक तथा रासपचे हायकमांड महादेव जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्भातील सर्व पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक पार पडली.  विदर्भामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष वाढविण्यासाठी आदरणीय महादेव जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करायचा असा निर्णय घेण्यात आला. विदर्भामध्ये पक्ष बळकट कसा होईल, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण कशी होईल, या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ तौसीफ शेख, महासचीव संजय कन्नावार, कर्मचारी अघाडीचे नंदकिशोर काळे सर, वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष. चंद्रशेखर भेंडे, यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष सुरज ठाकूर इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यशवंत नायक डिसेंबर 2023

 🐎 यशवंत नायक डिसेंबर 2023 🐎

*वाचक मित्रानो, 🙏*

*या अंकात काय वाचाल...*

पान १

_*धैर्य असून मत व्यक्त करू शकत नाही (क्षमता नाही म्हणून) तो मूर्ख आहे : डॉ. आंबेडकर*_

पान -२

_*क्षमता असून मत व्यक्त करण्याचे धैर्य दाखवत नाही (घाबरतो म्हणून) तो मूर्ख आहे  : डॉ. आंबेडकर*_

पान -३

_*क्षमता आणि धैर्य असून ही मत व्यक्त करत नाही (जाणीवपूर्वक  मौन राहतो म्हणून) तो कडवा, हटवादी, संकुचित आहे : डॉ. आंबेडकर*_




*मुख्य बातम्या –*

पान १

@ हिंगोली (यशवंत नायक ब्यूरो) : *ओबीसींनी सत्ताधरी व्हायचा विचार करावा : हिंगोलीत महादेव जानकर गरजले*

> *छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर मुख्यमंत्री असते..!* 

> *ओबीसींनी समाजकारण बाजूला ठेऊन राजकारणी बनावे*

@ मुंबई  :  *धन्य ते पिता : 'जगन्नाथ मारुती जानकर (आबा) यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!*

> *यशवंत नायक परिवार तर्फे विनम्र अभिवादन..!*

@ दर्यापूर (यशवंत नायक ब्यूरो) : *काँग्रेस, भाजप कडून जनतेचा भ्रमनिरास : महादेव जानकर*

> *विदर्भ राष्ट्रीय समाज पक्षाचा बालेकिल्ला व्हावा यासाठी प्रयत्न*

> *सत्तेची लालूच दाखवून मित्रपक्षांना संपवणे भाजपची निती*


पान : २

@ चंद्रगुप्त मौर्याचे सैन्यातील सेनापती लिहतात : *बुद्धीचा महासागर : सिध्दप्पा अक्कीसागर*

> *६७ व्या वाढदिवसानिमित्त अक्कीसागर साहेब यांना यशवंत नायक परिवारतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!*

@ कळंबोली (यशवंत नायक ब्यूरो) : *भक्ति शक्तिचा संगम साधत संत कनकदास व महाराजा यशवंतराव होळकर यांना अभिवादन*

> *संत कनकदासांनी विद्येच्या जोरावर पंडितांना आव्हान दिले*

> *महाराजा यशवंतराव होळकर यांना शालेय अभ्यासक्रमात स्थान दिले नाही : सुदर्शन अक्कीसागर यांनी व्यक्त केली खंत*


पान : ३ 

@ वर्धा (यशवंत नायक ब्यूरो ) : *समाजाचे हित होत नसेल तर अशा आमदारक्या आणि मंत्रिपद फेकून देऊ : महादेव जानकर*

> *ज्यांच्यासाठी आपला संघर्ष सुरू आहे, त्यांना आपली भाषा कळली नाही*

> *५२% ओबीसींचे ९ % आरक्षण भरले गेले नाही*

@ *रासप राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांचा परभणी लोकसभा मतदार क्षेत्र दौरा*

@ इंदापूर (यशवंत नायक ब्यूरो ) : *भुजबळ साहेब जोपर्यंत ओबीसींच्या हातात रिमोट कंट्रोल येणार नाही तोपर्यंत ओबीसी समाजाचे भल करू शकणार नाही: महादेव जानकर*

@बेळगाव (यशवंत नायक ब्यूरो) : *सपाचे कर्नाटक मुख्य महासाचिवांनी घेतली रासपचे एस. एल. अक्कीसागर यांचीभेट*


पान : ४

@ अंबड (यशवंत नायक ब्यूरो) : *आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही : छगन भुजबळ*

> *अंबड येथे ओबिसिंचा अतिविराट एल्गार महामेळावा*

> *जोपर्यंत ओबीसिंचा पक्ष होत नाही तोपर्यंत काहीही अर्थ नाही : महादेव जानकर*

@भोपाळ : *मध्य प्रदेश सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष लढला*

@ बारामती (यशवंत नायक ब्यूरो) : *बारामती लोकसभा मतदार क्षेत्रातील जनतेमुळेच रासपचा दबदबा वाढला : एस. एल. अक्कीसागर*

@ म्हसवड (यशवंत नायक ब्यूरो) : *मुलांची डोकी सुधारली की देश सुधारेल : महादेव जानकर*

> *सामान्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी तळमळ*

_*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*_

_*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*_

_*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*_

_ सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक

Thursday, December 28, 2023

एस. एल. अक्कीसागर म्हणजे ज्ञानाचा महासागर

एस. एल. अक्कीसागर 

ज्ञानाचा महासागर 



आज एस. एल. अक्कीसागर साहेबांचा वाढदिवस त्यानिमित्त....!

महादेव जानकर आजचे संगोळी रायन्ना- 

होय ! आजचे संगोळी रायन्ना महादेव जानकर साहेब आहेत हे अक्कीसागर साहेब यांनी कर्नाटकातील कुरुबा समाजाला ठासून सांगितलंय.  ते म्हणतात, संगोळी रायन्ना आज हयात नसताना रायन्नाचे पुतळे बांधण्यासाठी समाज खर्च करतो, पण आजचे संगोळी रायन्ना महादेव जानकर आहेत. कर्नाटकातील कुरुबा समाजाने आजच्या संगोळी रायन्नांना अर्थातच जानकर साहेबांना साथ द्यावी. आता जर जानकरांच्या कार्याला साथ न देता  उद्या जर कोणी महादेव जानकरांचा कर्नाटकात पुतळा बांधला तर तो तोडून टाकण्यासाठी मी पहिला पुढे येईल, असा इशारा अक्कीसागर साहेब यांनी कुरुबा समाजाला दिलाय ; असे संगोळी रायन्ना युवा संघटनेचे बेंगलोर निवासी शिवा कुरुबा सांगतात.

२९ सप्टेंबरला मासिक विश्वाचा यशवंत नायकला २५ वर्ष पूर्ण झाली. आज महाराष्ट्रातील राष्ट्रिय समाजात वैचारीक, बौद्धिक विचाराची घुसळण पहायला मिळत आहे, त्यापाठीमागे यशवंत नायक अंकातुन अक्कीसागर साहेब यांनी अखंडपणे केलेले लिखाण आहे. राष्ट्रिय समाजात प्रचार- प्रसार करण्यासाठी महाराज यशवंतराव होळकर यांच्या नावाने मासिक पत्र चालू करुन ऐतिहासिक असे मोठे कार्य केले. नुकतीच महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती देशभरात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाराजांचा फोटो यशवंत नायक अंकातून प्रसिद्ध करुन इतिहासाच्या उदरात गडप केलेल्या राष्ट्रविराला प्रकाश झोतात आणण्याचे कार्य अक्कीसागर यांनी केले.  यशवंत नायक अंकाचे संपादन कार्यात ते २५ वषापसून कार्यरत आहेत. ते उत्कृष्ट संपादक आहेत. 


अक्कीसागर साहेब दोन वर्षापूर्वी रिझर्व बँकेच्या मुख्यालयातू जनरल मँनेजर पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तिनंतर लोक समाजकार्याकडे वळतात, पण अक्कीसागर साहेब यांनी सुरुवातीपासूनच समाज कार्यात  झोकुन देऊन काम केले आहे. आजही पायाला भिंगरी बांधून देशभर वेगवेगळ्या राज्यात राष्ट्रिय समाज पक्षाचे संघटन बांधणीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.


अक्कीसागर साहेब ऑल इंडिया रिझर्व बँक ओबीसी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. रिझर्व बँक एसईबीसी एम्प्लॉईज, मुंबई चे संस्थापक अध्यक्ष,  राष्ट्रिय यशवंत सेनेचे राष्ट्रिय सचिव, 'यशवंत नायक' मासिकपत्राचे कार्यकारी संपादक, लेखक, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल, दिल्ली चे सदस्य, श्री. कागिनेली महासंस्थान कनक गुरुपीठ, कर्नाटक सदस्य, राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष आहेत. 


महाराष्ट्रातील धनगर, राष्ट्रिय समाजात दहा- पंधरा वर्षापासून सामाजिक, राजकिय व अन्य क्षेत्रात जो बदल घडत आहेत तो सहजासहजी घडत नाही, त्यासाठी मोठी ताकद खर्ची पडलेली आहे याचे ते साक्षीदार व भागिदार आहेत.


अक्कीसागर साहेब यांचा सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, ऐतिहासिक, राजकिय, सांस्कृतिक अभ्यास खूप मोठा आहे. अक्कीसागर यांच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे. देशभरातल्या विविध राज्यात त्यांना ओळखणारा,  विचाराला मानणारा समाज घटक आहे. अक्कीसागर साहेब यांच्या व्यक्तिमत्त्वावर लिहण्यासारख, बोलण्यासारखं खुप काही आहे पण आज एवढेच म्हणेन की, अक्कीसागर साहेब म्हणजे ज्ञानाचा महासागर आहेत.  नदीचा अंदाज करता येतो पण सागराचा नाही, अक्कीसागर साहेब तर महासागर आहेत. माझ्यासारख्या युवकाला तर इतक्या कमी वेळात त्यांच्या ज्ञानरूपी व्यक्तिमत्त्वाचा उलगडा होणार नाही, याची मला खात्री आहे.

थोर विचारवंत, उत्तम संघटक, अभ्यासक, पत्रकार, राष्ट्रप्रेमी, मानवतावादी नेतृत्व, लेखक, कवी एस. एल. अक्कीसागर साहेब यांनी शतायुषी व्हावे अशा त्यांना ६२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो.  

शुभेच्छुक :  ए. एस. पुकळे व पुकळे परिवार.

५- १२- २०१८

Wednesday, December 27, 2023

भुजबळ साहेब जोपर्यंत ओबीसींच्या हातात रिमोट कंट्रोल येणार नाही तोपर्यंत ओबीसींचे भल करू शकणार नाही : महादेव जानकर

भुजबळ साहेब जोपर्यंत ओबीसींच्या हातात रिमोट कंट्रोल येणार नाही तोपर्यंत ओबीसींचे भल करू शकणार नाही : महादेव जानकर


इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्यात रासपचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर व समोर विराट जनसमुदाय

इंदापूर (९/१२/२३) : आबासो पुकळे 

"सत्तेशिवाय शहानपणा नाही. जोपर्यंत ओबीसींच्या हातात रिमोट कंट्रोल येणार नाही, तोपर्यंत भुजबळ साहेब आपण ओबीसींना न्याय देऊ शकत नाही. आपला मालक जर दुसरा असेल आणि चालवणारे आपण असू तर हित होणार नाही, असे रोखठोक विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर, माजी मंत्री यांनी केले. आ. जानकर इंदापूर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलत होते. यावेळी मंचावर   ना. छगन भुजबळ- कॅबिनेटमंत्री, माजी आ. प्रकाश आण्णा शेंडगे, प्रा. टी. पी. मुंडे, शब्बीर अन्सारी, माजी खा. समीर भुजबळ, लक्ष्मण गायकवाड आदी मंचावर उपस्थित होते.


महादेव जानकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले, सगळ्यांची भाषण ऐकली. अंतिम सत्य हे येतेय की, सत्तेविना सकळ कळा ! झाल्या अवकळा!! सत्ता नसल्यामुळे आपल्या सर्वांची अवकळा झालेली आहे.  महात्मा फुलेंनी सत्ता पाहिजे असे सांगितले आहे. सत्ता आपली (ओबीसींची) पाहिजे, पंतप्रधान आपला पाहिजे, मुख्यमंत्री आपला पाहिजे, पक्ष आपला पाहिजे त्यावेळेस हे शक्य होणार आहे. म्हणून प्रस्थापितांच्या दुसऱ्याच्या पक्षात बसून सल्ला देत असू तर हे शक्य होणार नाही. निवडणुकीच्या आधी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. गावागावात अतिशय वातावरण चांगला आहे चांगला प्रतिसाद मिळत आहे. साळी, माळी, कोळी, तेली, धनगर, वडार, बेलदार, लोणारी, मुसलमान, कैकाडी, सर्व समाज आदराने वागत आहेत. एकत्र येत आहेत. सर्व ओबीसींना काहीतरी आशेचा किरण दिसतोय. अंतिम सत्य हेच आहे, सत्तेशिवाय शहानपणा नाही. जोपर्यंत ओबीसींच्या हातात रिमोट कंट्रोल येणार नाही, तोपर्यंत भुजबळ साहेब आपण ओबीसींना न्याय देऊ शकत नाही. आपला मालक जर दुसरा असेल आणि चालवणारे आपण असू तर हित होणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे. आमचे तुम्ही नेते आहेत. तुम्ही वडीलधारी आहात. महाराष्ट्रात पहिल्यांदा भुजबळ साहेबांकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर आम्ही शांत बसणार नाही असा सांगणारा पहिला महादेव जानकर आहे.  म्हणून सांगू इच्छितो, 'आय एम नॉट डिमांडर वुई आर कमांडर. भीक मागणारी आमची औलाद नाही, देणार अवलाद बनलं पाहिजे. म्हणून तुम्ही अभ्यास करा.  ओबीसींचे आयएएस कुठे आहेत?, आयपीएस कुठे आहेत, तुमचे गव्हर्नर कूठे आहेत?, तुमच्या क्लास वन च्या जागा कुठे भरल्या गेल्यात? आकडेवारी नाही. आमचा थिंक टँक हरी नरके असल्यामुळे पाच मिनिटात देत होता. हरी नरके नसल्यामुळे ते दु:ख आज आम्हाला सहन कराव लागतय, बांधवांनो. म्हणून बुद्धीवादी विचारांने चला. बुद्धीजिविनी बुद्धीनेच उत्तर देत चला. गावगाड्यातील लोकांनी एकत्र यायचा प्रयत्न करा. नुसती जिल्हा परिषद, पंचायत समितीची चर्चा करू नका, खासदारा पासून सुरवात करा आणि आमदारावर शेवट करा. तरच तुमचं भल झाल्याशिवाय राहणार नाही. भुजबळ साहेब मी नेहमी तुमच्याबरोबर असणार आहे. Don't worry. आपण तुमच्या बरोबर असणार आहे. पक्षाचा मालक मीच असणार आहे. माझा मालक दुसरा कुणी नसणार आहे. माझा मालक फक्त महात्मा फुले आहेत.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष लढला

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष लढला

         


भोपाळ : राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत 14/11/2023 रोजी करैरा विधानसभा व‌ पिछोर विधानसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार मीना कोरी व रामसिंह पाल तसेच सुरेश कुशवाहा मैदानात लढले. कोळी, माळी आणि धनगर असे तीन राष्ट्रीय समाजाचे उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी रासप सुप्रीमो महादेव जानकर  यांनी जनसभेला संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील,अवध प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रपाल सहित अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 दरम्यान सर्किट हाउस झांसी येथे माननीय महादेव जानकर, झांशी पूर्व जिला पंचायत अध्यक्ष राकेश पाल, संजय पाल, डॉ राजेश पाल जी, एडवोकेट भरत पाल, जुगल किशोर पाल, राम बाबू पाल व अन्य काही सामाजिक व राजकीय मुलाकात केली. मध्य प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष प्राणसिंह पाल यांच्या घरी महादेव जानकर यांनी भाई दूज साजरी केली.

रासप राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांचा परभणी लोकसभा दौरा

रासप राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांचा परभणी लोकसभा दौरा

जिंतुर : (७,८-१२-२३) प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरनर, ओमप्रकाश चीतळकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघात दौरा केला. दौऱ्यात पाथरी विधानसभा कार्यकर्ता बैठक, जिंतूर विधानसभा कार्यकर्ता बैठक, जिंतूर शहर कार्यकर्ता बैठक, परभणी विधानसभा कार्यकर्ता बैठक, सेलू कार्यकर्ता बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेऊन काही ठिकाणी नवीन पदाधिकारी नियुक्त्या केल्या. 

यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानोबा ताटे, परभणी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दुगाणे, पाथरी तालुका अध्यक्ष हिंगे, पाथरी तालुका युवक अध्यक्ष गोपाळ नरवटे, तालुका  उपाध्यक्ष अकबर, तालुका संपर्क प्रमुख गोपाळ आव्हाड , तालुका युवक उपाध्यक्ष आव्हाड, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष तोफिक अन्सारी, पाथरी शहर अध्यक्ष अशोक पितळे, सोगे, लक्ष्मण लव्हाळे व अन्य उपस्थित होते.

मुलांची डोकी सुधारली की देश सुधारेल : महादेव जानकर

मुलांची डोकी सुधारली की देश सुधारेल : महादेव जानकर

म्हसवड : यशवंत नायक ब्यूरो

शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण चांगल्या प्रकारे मुलांना मिळाले पाहिजे. मुलांची डोकी सुधारली की देश सुधारेल. शिक्षणामुळेच क्रांती करता येईल. शिकेल तोच टिकेल. जिल्हा परिषद येथून गरीब, शेतकरी व सामान्यांचीच मुले शिकत आहेत. श्रीमंताची, आमदार, खासदाराची मुले चांगल्या कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेऊन, पुढे इंग्लंड अमेरिकेत शिक्षणासाठी जात आहेत. सामान्यांची मुले शिकले पाहिजेत, त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी माझी तळमळ असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले. वीरकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेकरता त्यांच्या फंडातून बारा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेल्या कामाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जानकर बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार जंगम, मार्केट कमिटी उपसभापती वैशालीताई विरकर, माजी नगराध्यक्ष तुषार विरकर, ग.शि. लक्ष्मण पिसे, किसन वीरकर, ईश्वरा खोत, डॉक्टर बाळाराजे वीरकर, आप्पासाहेब पुकळे, गुलाबराव उगलमुगले, बबनदादा वीरकर, दादासाहेब दोरगे, जगन्नाथ विरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील आमच्या गावी आले नसते तर आम्ही शिकलो नसतो. गावात एक वेळ रस्ता नसला तरी चालेल पण मुले चांगली शिकली पाहिजेत गावकरी समाज मंदिरासाठी ज्याप्रमाणे पुढाकार घेत आहेत त्याचप्रमाणे शाळा सुधारण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत.

जोपर्यंत ओबीसींचा पक्ष तयार होणार नाही, तोपर्यंत काहीही अर्थ नाही : महादेव जानकर

जोपर्यंत ओबीसींचा पक्ष तयार होणार नाही, तोपर्यंत काहीही अर्थ नाही : महादेव जानकर

अंबड येथे रॅलीत रासप सुप्रीमो महादेव जानकर 


जो ओबीसी की बात करेगा! वही देशपर राज करेगा !! असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अंबड येथील ओबीसी एल्गार महामेळाव्यात घणाघाती भाषणात, जोपर्यंत ओबीसींचा पक्ष तयार होणार नाही, तोपर्यंत आपल्या ओबीसी चळवळीला काही अर्थ राहणार नाही, असे रोखठोक विधान केले. पुढे आ. जानकर म्हणाले, काँग्रेसचा किंवा बिजेपीचा ओबीसी माणूस येईल आणि तुमची मते लुटली जातील, तेव्हा भुजबळ साहेब तुम्ही महात्मा फुलेवादाचा स्वतःचा ओबीसींचा पक्ष काढा, माझी तुम्हाला विनंती आहे. दुसऱ्या पक्षाचे आमदार, खासदार येतील आणि याला मत द्या, त्याला मत द्या म्हणतील, पण त्याला ओबीसी म्हणू नका. रासप नेते महादेव जानकर यांनी केवळ ४० सेकदांच्या भाषणात मंचावर उपस्थित व समोर उपस्थित जनसमुदयास विचार करण्यास भाग पडल्याची चर्चा जनतेत रंगली.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...