Tuesday, February 28, 2023

राष्ट्रीय समाज पार्टी कानपुर के द्वारा ज्ञापन

 राष्ट्रीय समाज पार्टी कानपुर के द्वारा ज्ञापन




आज 28 फरवरी 2023 को राष्ट्रीय समाज पार्टी कानपुर के द्वारा प्रयागराज में अधिवक्ता उमेश पाल की व उनके सुरक्षा में लगा सिपाही संदीप निषाद की  गोली व बमों से हमला कर हत्या कर दी गई थी। आज मा मुख्यमंत्री उत्तर प्रदेश सरकार को जिलाधिकारी कानपुर नगर के द्वारा ज्ञापन सौंपा गया।

      ज्ञापन मैं प्रमुख रूप से प्रदेश अध्यक्ष चंद्रपाल जिला अध्यक्ष कानपुर दक्षिण फौजी सुरेश पाल, जिला उपाध्यक्ष संजय त्रिवेदी, जिला सचिव मोनू पाल, विजयपाल सिंह ,गोविंद पाल, एडवोकेट योगेंद्र विश्कर्मा एडवोकेट राम मिलन पाल राम राजपाल एडवोकेट अखिल भारतीय पाल महासभा के जिलाध्यक्ष राजेश पाल, महामंत्री भागीरथ पाल, रामस्वरुप पाल व कांग्रेस के नेता राजकुमार पाल, फूलचंद पाल  आदि लोग उपस्थित रहे।

उमेश पाल की हत्या के विरोध में जनपद इटावा वासियों का ज्ञापन

 उमेश पाल की हत्या के विरोध में जनपद इटावा वासियों का ज्ञापन

----------------------------------------





वीर शहीद एडवोकेट उमेश पाल एवं उनके सुरक्षाकर्मी संदीप निषाद की दिनदहाड़े निर्मम हत्या के विरोध में राष्ट्रीय समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेव जानकर साहब के नेतृत्व में प्रदेश प्रभारी अनुपम पाल एवं प्रदेश अध्यक्ष चंद्रपाल के संयुक्त प्रदेश व्यापी आवाहन पर सभी जनपदों पर ज्ञापन सौंपे गए।

      जनपद इटावा में जिला अध्यक्ष राजीव पाल के नेतृत्व में ज्ञापन सौंपा गया।

      जिसमें शहीद एडवोकेट उमेश पाल एवं सुरक्षाकर्मी संदीप निषाद को शीघ्र न्याय मिले और हत्यारों को फास्ट ट्रैक कोर्ट में प्रस्तुत किया जाए एवं मृतकों के परिवारों को 10 करोड़ रुपए की क्षतिपूर्ति के रूप में प्रदान की जाए।

        महासचिव मलखान सिंह बघेल राष्ट्रीय समाज पार्टी इटावा के आवाहन पर महिला नगर अध्यक्ष उर्मिला भदौरिया, नगर अध्यक्ष मोहम्मद रफी, जिला मंत्री प्रद्युम्न दिवाकर, नगर मंत्री विपिन बघेल, विधिक सलाहकार सुबोध पाल, अमर सिंह पाल, एडवोकेट अनिल बघेल, जेपी पाल, मीडिया प्रभारी शास्त्री जी और पार्टी के तमाम कार्यकर्ताओं ने सिटी मजिस्ट्रेट को ज्ञापन प्रदान किया कर अपनी मांगो को शासन के समक्ष रखा।

          इस कार्यवाही की प्रदेश संगठन मंत्री ठाकुर प्रदीप सिंह तोमर ने न्याय और अन्याय के बीच की लड़ाई बताया और कहा कि "राष्ट्रीय समाज पार्टी" हमेशा सत्य के साथ खड़ी रहेगी।




प्रो महेंद्र पाल सिंह धनगर

    प्रदेश प्रवक्ता अवध

     राष्ट्रीय समाज पार्टी

कांद्याला भाव नसल्याने पुणे - अहमदनगर महामार्गावर राष्ट्रीय समाज पक्षाचा रास्ता रोको

कांद्याला भाव नसल्याने पुणे - अहमदनगर महामार्गावर राष्ट्रीय समाज पक्षाचा रास्ता रोको 

शेतकरी वाचवा देश वाचवा : रासपची जोरदार घोषणाबाजी 

शिरूर : शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा, कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा, थकीत वीजबिल माफ करावे, गायरान जमिनी मेंढपाळ, पशुपालक यांचेसाठी खुली करावेत आदींसाठी आज शिरूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पुणे - अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. कांद्याच्या माळा गळ्यात घालत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्तेनी जोरदार घोषणाबाजी केली.  रासपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काहीवेळ वाहतूक ठप्प झाली. तहसीलदार यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.  महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे, त्यामुळे अर्थातच बाजारपेठेत आवक चांगली आहे. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल भावाने विकला जातो आहे.  शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रती क्विंटल १५०० रू खर्च येतो परंतु आज बाजारात ३०० ते ५०० रू क्विंटल दराने विकला जातो आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होणार आहे, तरी महाराष्ट्र शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १००० रूपये अनुदान देण्यात यावे आणि यापुढे कांद्याला प्रती क्विंटल किमान ३००० रूपये हमीभाव देण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. आंदोलनात रासपचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, ज्येष्ट नेते रामकृष्ण बिडगर, सागर देवकते व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.




चंद्रपुरात राष्ट्रीय समाज पक्षाचे आढावा बैठक संपन्न

 चंद्रपुरात राष्ट्रीय समाज पक्षाचे आढावा बैठक संपन्न 



चंद्रपूर : येथे आज दिनांक 28/ 02/ 2023 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील सर खास उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते विदर्भ सचिव संजय कन्नवर यांच्यासह जिल्हाभरातून राष्ट्रीय समाज पक्षाचे जुने नवे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात यावेळी काही नवनियुक्त पदाधिकारी नियुक्त करून राष्ट्रीय समाज पक्षाचा चंद्रपूर जिल्ह्यातील पक्ष संघटनात्मक विस्तार करण्यात आला. आगामी निवडणुकीत कोणासोबत युती आघाडी न करता पक्ष स्वतःच्या ताकतीवर निवडणुकीला सामोरे जाईल.

राष्ट्रीय समाज पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी संजय दिवसे यांची नियुक्ती

राष्ट्रीय समाज पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी संजय दिवसे  यांची नियुक्ती                 
यवतमाळ जिल्हा रासप आढावा बैठकित बोलताना मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, बाजूस प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व अन्य.
यवतमाळ : राष्ट्रीय समाज पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी संजय दिवसे यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.  दिनांक २७/०२/२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते व प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, विदर्भाचे दौऱ्यावर असताना विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. ऍड.रमेश पिसे व विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यांची आढावा बैठक शासकीय विश्राम भवन यवतमाळ येथे पार पडली.  जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढूवन, पक्ष संघटना बांधणी मजबुत करावी. 

2024 च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात सत्ता स्थापनेच्या निर्णय प्रक्रियेत असणार आहे. त्या दृष्टीने रासप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. विदर्भ ही राजकीय दृष्ट्या सुपीक जमीन आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत करण्याची तयारी ठेवावी, असेही काशिनाथ नाना शेवते म्हणाले. बैठकीला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संजय दिवसे, विलास काळे, प्रफुल खेडकर, ज्ञानेश्वर रायमल, जितेंद्र खाटीक, सुनील लोखंडे आदी रासप समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.


यवतमाळ येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर येथील डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या संकल्पनेतून आणि योगदानातून उभारलेल्या महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठाला राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी विलासजी काळे यांनी स्वागत केले. यावेळी श्री. काळे यांनी विद्यापीठाची संकल्पना स्पष्ट केली. १८ ते ३० वयोगटातील तरूण, तरूणींना सत्यशोधक विचारांचा, फुले वादाचा प्रचार प्रसार करण्यासाठी अभ्यास करण्याकरिता मोफत शिबीर आयोजित केले जाते. तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. अतिशय स्तुत्य उपक्रम ज्याची नितांत गरज आहे असे कार्य याठिकाणी सुरू आहे, असे मत राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांनी मांडले.

Monday, February 27, 2023

एड. उमेश पाल यांच्या हत्येचा निषेध करत उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

एड. उमेश पाल यांच्या हत्येचा निषेध करत उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

आरोपींचा पुतळा जाळून निषेध करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

बदायु : आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी बरेली मंडल राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांनी स्व. आमदार राजू पाल यांच्या हत्येतील मुख्य साक्षीदार एड. उमेश पाल व त्यांचे दोन सुरक्षा रक्षक यांच्यावर २४ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे खुलेआम गोळीबार करून हत्या करण्यात आल्याच्या निषेध करून बदायु मालवीय आवास येथे रासप कार्यकर्तेनी एकत्र येत शोक संवेदना व्यक्त केली. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्ष समर्थकांनी आक्रमक होत हत्याकांडातील मुख्य आरोपी अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांचे पुतळे जाळून तीव्र असंतोष प्रकट करत बदायु येथील मुख्य चौकात एक तास रस्ता रोखून धरत चक्काजाम करण्यात आला. 

रासपने बदायु जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की, मुख्य आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळून फाशीची शिक्षा द्यावी, तसे न झाल्यास उत्तर प्रदेशात राज्यभर राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून चक्काजाम करू. रासप बदायु मंडल अध्यक्ष एड. जितेंद्र सिंह पाल म्हणाले, शासन प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास रासप पार्टी वकील टीम व अन्य वकिलांच्या साथीने प्रशासनिक कार्यात अडथळा निर्माण करेल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव बदन पाल भैय्या, बदायु जिल्हाध्यक्ष मुनेंद्र सिंह, बरेली सरचिटणीस लटुरी लाल पाल, बार असोसिएशनचे एड. राजेंद्र बघेल, राकेश बघेल, प्रेम सिंह फौजी, संतोष पाल, नरेंद्र मोहन पाल, विवेक पाल, गेंदालाल बघेल, मोरध्वज बघेल, अन्य शेकडो रासप समर्थक उपस्थित होते.

|प्रा. आबासो पुकळे, मुंबई.

रासपच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी वंदिले, सरचिटणीसपदी गुजरकर, किसान आघाडी अध्यक्षपदी देवतळे

रासपच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी वंदिले, सरचिटणीसपदी गुजरकर, किसान आघाडी अध्यक्षपदी देवतळे 

वर्धा : यशवंत नायक ब्यूरो

राष्ट्रीय समाज पक्षाचे वर्धा जिल्हा अध्यक्षपदी सुनील वांदिले, जिल्हा महासचिवपदी सुनील गुजरकर व किसान आघाडीचे अध्यक्षपदी रविंद्र देवतळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील सर यांनी यशवंत नायकला कळवले आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष  काशिनाथ (नाना) शेवते, राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर गेली तीन दिवसापासून विदर्भाचे दौऱ्यावर आहेत.  यावेळी विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत वर्धा जिल्हाध्यक्षपदी सुनील वांदिले, जिल्हा महासचिवपदी सुनील गुजरकर तर किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पदी  रविंद्र देवतळे यांची नियुक्ती करण्यात आली व प्रदेशाध्यक्ष व महासचिव यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अधयक्ष काशिनाथ नाना शेवते व प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर विदर्भाचे दौऱ्यावर आज वर्धा येथून यवतमाळ जिल्हा बैठकीला जात आसताना, श्री क्षेत्र कळंब येथील चिंतामणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी आगामी निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्ते / पदाधिकारी यांना बळ आणि आशीर्वाद द्या, असे साकडे घातले. यावेळी विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख कृषीसम्राट राजेंद्र पाटील उपस्थित होते.

Sunday, February 26, 2023

राष्ट्रीय समाज पक्ष नागपूर जिल्हा आढावा बैठक पार

राष्ट्रीय समाज पक्ष नागपूर जिल्हा आढावा बैठक पार 

आज दिनांक २६/०२/२०२३ रोजी नागपूर येथे राष्ट्रीय समाज पक्ष नागपूर जिल्ह्य आढावा बैठक पार पडली. बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ प्रांत अध्यक्ष एड. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने सर्व उमेदवार उभे करण्यासाठी, पक्ष बांधणी  करण्याच्या संदर्भात  चर्चा झाली. तसेच वर्धा जिल्हा अध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.



राष्ट्रीय समाज पक्ष नाशिक जिल्हा पदाधिकारी बैठक उत्सहात संपन्न; नाशिक जिल्ह्यात मार्चमध्ये भव्य मेळावा घेणार

राष्ट्रीय समाज पक्ष नाशिक जिल्हा पदाधिकारी बैठक उत्सहात संपन्न; नाशिक जिल्ह्यात मार्चमध्ये भव्य मेळावा घेणार 

नाशिक : दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष, नाशिक जिल्हा मुख्य पदाधिकारी यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश सचिव राजाभाऊ पोथारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल तेजल येथील हॉलमध्ये घेण्यात आली. बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख कैलासभाऊ हाळनोर, संजय पाल, नाशिक जिल्हाअध्यक्ष डाॅ. अरुण आव्हाड, नाशिक शहराध्यक्ष विलास पलंगे, युवक जिल्हाअध्यक्ष नवनाथ शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक भागवत सापनर, ज्येष्ठ नेते अरुणभाऊ शिंदे, अल्पसंख्यांक जिल्हाअध्यक्ष समशेद खान, ग्रामीण जिल्हाअध्यक्ष मनोज लाड, नाना मोगरे, अरुण वाजे, उपजिल्हाध्यक्ष विजय शिंदे, ज्ञानेश्वर पारखे, तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर बिडगर, रमेश घुगे, उपशहराध्यक्ष खुशीराम पाल, तालुका सरचिटणीस श्री. पारखे, अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष शादाब खान, प्रसिद्धी प्रमुख संतोष मासुळे आदी उपस्थित होते.

श्री.धिरज पाटील यांची युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. सर्व पदाधिकारी यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकरसाहेब यांचा वाढदिवस नाशिक शहरात अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा मनोदय व्यक्त करून, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून करण्यात यावा, अशी एकमताने ठरवण्यात आले. तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत, आपले उमेदवार देऊन ते कसे विजयी करता येईल, यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच पक्ष संघटन मजबूत करून, सदस्य संख्या वाढवण्यासाठी अतोनात प्रयत्न करू असा विश्वास दर्शवला.

नाशिक जिल्हातील प्रत्येक पदाधिकारी पक्षासाठी तळमळीने काम करण्यासाठी कटिबंध आहे. प्रत्येक कार्यकर्ता अतिशय निष्ठावंत व पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. यापुढेही असेच काम करतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश सचिव राजाभाऊ पोथारे, डॉ. अरुण आव्हाड यांनी व्यक्त केला. उपस्थित सर्वच पदाधिकारी यांनी विविध सुचना केल्या. शहराध्यक्ष विलास पलंगे यांनी पक्षाच्या प्रसिद्धीसाठी आपल्याकडे असलेल्या वाहनावर पक्षाचे व नाव प्रत्येकाने टाकावे अशी सूचना केली, त्यावर सर्व पदाधिकारी यांनी त्या सुचनेस अनुमती दिली. अध्यक्षीय भाषण राजाभाऊ पोथारे यांनी केले. श्री अरुण वाजे व नवनाथ शिंदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. मार्चमध्ये  नाशिक जिल्ह्यात वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमवेत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

मुर्तिजापूरात राष्ट्रीय समाज पक्षाची अकोला जिल्हास्तरीय आढावा बैठक यशस्वी

मुर्तिजापूरात राष्ट्रीय समाज पक्षाची अकोला जिल्हास्तरीय आढावा बैठक यशस्वी 


अकोला : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर साहेब यांचे आदेशानुसार  अकोला जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांची शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3:00 वा. शासकीय विश्रामगृह मूर्तिजापूर येथे रासप प्रदेशाध्यक्ष काशिनाथ (नाना) शेवते यांचे अध्यक्षतेत आढावा बैठक पार पडली. बैठकीत जिल्ह्यातील आगामी स्थानिक निवडणुकिच्या बाबतीत पक्षाची रणनीती ठरवण्यात आली. पक्ष संघटन बांधणी मजबूत करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश अध्यक्ष काशिनाथनाना शेवते, प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील आदी मान्यवरानी बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. अकोला जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांनी पक्षाची आगामी काळात ताकद निर्माण करण्यासाठी, वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे यांनी सांगितले.

याबैठकीत जिल्ह्यातील वामन पाठक, संदीप शिरसाठ, चंदन शिरसाठ, रमेश उगले, बजरंग डांबेराव, गजानन सोळुंखे, सदानंद सोळूंखे, मंगेश मानकर रासप कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांचा टमटमने प्रवास

राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांचा टमटमने प्रवास 

विदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाची  बांधणी मजबूत करताना रासप  प्रदेश अध्यक्ष काशिनाथ( नाना ) शेवते, प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली )सलगर आणि विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील  विदर्भ दौऱ्यावर रासप कार्यकर्त्याच्या टमटमने प्रवास करताना..... !!!

विदर्भस्तरीय पूर्व नियोजित दौरा >>

शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 

  • सकाळी 11:00 वा. बुलढाणा 
  • सायंकाळी 4:00 वा. अकोला

शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023  

  • सकाळी 11:00 वा. वाशीम 
  • सायंकाळी 4:00 वा. अमरावती. 

रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023

  • सकाळी 11: 00 वा. नागपूर

सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023

  • सकाळी 11: 00वा वर्धा तर 
  • सायं 4 : 00 वा यवतमाळ

मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023

  • सकाळी 11: 00 वा चंद्रपूर तर 
  • सायंकाळी 4: 00 वा गडचिरोली

बुधवार दिनांक 1 मार्च 2023

  • सकाळी 11: 00 वा.गोंदिया 
  • सायं 4 : 00 वा भंडारा 

येथे बैठका आयोजित करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय समाज पक्ष नेवासा तर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादन

 पानेगाव ता - नेवासा येथे राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादन 



राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्हा पदाधिकारी निवडी पार

राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्हा पदाधिकारी निवडी पार


बुलढाणा येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार 


बुलढाणा : २४/०२/२०२३ राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्हा पदाधिकारी निवडी पार पडल्या.

यावेळी बुलढाणा जिल्हा (घाटाच्या खालील तालुके) अध्यक्षपदी शिवदास सोनोने यांची निवड करण्यात आली, बुलढाणा जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी प्रतिभाताई डोंगरे यांची निवड करण्यात आली, बुलढाण्याच्या लोकसभा अध्यक्षपदी प्रभाकर डोईफोडे यांची निवड करण्यात आली.  महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी कल्पना खरे, सिंदखेड विधानसभा अध्यक्षपदी कारभारी गायकवाड, सिंदखेड तालुका अध्यक्षपदी संतोष वनवे यांची नियुक्ती करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी या नवनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

या बैठकीचे नियोजन जिल्हा अध्यक्ष अमोल काकड आणि जिल्हा संपर्क प्रमुख अतुल भुसारी यांनी केले.

शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करा : कराड, पाटण तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन

शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करा : कराड तहसीलदार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन 

कराड तहसीलदार यांना निवेदन सादर करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप धुमाळ व अन्य.

पाटण तहसीलदार यांना निवेदन सादर करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पदधिकारी

कराड/ पाटण : यशवंत नायक ब्यूरो 

शेतकऱ्यांचे थकीत विज बिल माफ करून, शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे त्वरित वीज कनेक्शन जोडावे, या मागणीचे निवेदन कराड व पाटण येथे तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, लोकसभा अध्यक्ष मा.उमेश चव्हाण, डॉ. रमाकांत साठे सातारा जिल्हा सरचिटणीस, रवींद्र भिसे, आदित्य ठोंबरे, शिवाजी रणदिवे, कराड तालुकाध्यक्ष सविताताई कणसे, कोरेगाव तालुका अध्यक्ष गीताताई जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीकांत देवकर म्हणाले, माननीय मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांनी तात्काळ या विषयी बैठक बोलावून, निर्णय करावा. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल

आष्टी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा संपन्न

आष्टी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा संपन्न




आष्टी : नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे ध्येय धोरण व जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबळावर निवडण्यासाठी वन प्रमुख गटप्रमुख यांची निवड करण्यात यावी, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या ध्येयधोरणानुसार वाटचाल करण्यात यावी. नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांचे अतिशय छान मनोगत झाले. हा मेळावा अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी शेंडगे राज्य सरचिटणीस, श्री अण्णासाहेब मतकर बीड जिल्हाध्यक्ष, श्री परशुराम काशीद विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष, श्री शिवाजी चांगण जिल्हा सरचिटणीस, श्री माऊली मार्कड बीड विधानसभा अध्यक्ष, श्री महादेव दळवी जिल्हा उपाध्यक्ष बीड, श्री विक्रम बाप्पा सोनसळे लोकसभा अध्यक्ष, श्री राम लकडे शहराध्यक्ष, श्री जगताप साहेब आष्टी विधानसभा अध्यक्ष, श्री प्रमोद बोडके शिरूर तालुका उपाध्यक्ष, श्री डॉक्टर तांबे जिल्हा सचिव बीड, श्री शिवाजी गोरे तालुका अध्यक्ष पाटोदा, श्री रतन भोंडवे तालुका उपाध्यक्ष पाटोदा, श्री भाऊ दिंडे तालुकाध्यक्ष आष्टी, श्री कैलास पन्हाळकर, श्री सुनील सानप इतर सर्व निर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांचे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने खूप खूप अभिनंदन व सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय राहुरी येथे विनम्र अभिवादन

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय राहुरी येथे विनम्र अभिवादन




राहुरी :

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय राहुरी जिल्हा अ,नगर येथे  महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी रासप उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदभाऊ बाचकर व सौ.मीनाताई शरद बाचकर यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले तसेच याप्रसंगी अ,नगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, युवक जिल्हाध्यक्ष नंदू खेमनर,राहुरी खुर्द माजी सरपंच उमेश बाचकर, यांनी मनोगत व्यक्त करून जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपसरपंच तुकाराम बाचकर, युवक जिल्हा महासचिव मालोजी तिखोळे, वसंतराव बाचकर वरिष्ठ लिपिक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,तालुका अध्यक्ष कपिल लाटे, बिलाल शेख अल्पसंख्यांक आघाडीतालुकाध्यक्ष ,युवक तालुकाध्यक्ष करण माळी, भारत चौधरी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष, विशाल भावले रासप नेते, संजय वराळे व्यापारी राहुरी, नितीन शहाणे,  भारत हापसे, हेमंत जाधव, लोखंडे साहेब इंजिनिअर ,आप्पासाहेब विटनोर, बाळासाहेब विटनोर, अक्षय शिंदे, सुभाष बर्डे ,भगवान गायकर, सुधीर गायके, कुशल चव्हाण, महेश पवार ,अक्षय कडणर आदि अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

Saturday, February 25, 2023

यशवंत नायक – फेब्रुवारी 2023

 *यशवंत नायक – फेब्रुवारी 2023*






*वाचक मित्रानो, 🙏*

*या अंकात काय वाचाल...*


पान १

_*यशवंत नायक आपले मत व्यक्त करणारा, प्रथम प्रतिनिधी आहे. यशवंत नायक वाचा- गांभीर्यपूर्वक वाचा*_


पान -२

_*यशवंत नायक वाचले, विकत घेऊन वाचले -आनंद वाटेल. आपले मत व्यक्त केले, समीक्षा केली- कृतार्थ वाटेल...*_


पान -३

_*प्रतिकूल मत मांडले, स्तुती टाळून भरीव निंदा केली तरी, आनंद वाटेल. पण यशवंत नायक वाचले नाही तर वाईट वाटेल..*_


*मुख्य बातम्या – पान 1* 

@ नंदगड- कर्नाटक : यशवंत नायक ब्यूरो

*आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना राष्ट्रवीर; त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात रासपचे चार आमदार : महादेव जानकर*


> *आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष खाते उघडणार : महादेव जानकर* 


> *राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव उत्साहात संपन्न*


> *रासपच्या चळवळीमुळेच संगोळी रायण्णा दफनभूमी नंदगड क्षेत्रास महत्व आणि विकासास गती प्राप्त : रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांचे निसंदिग्ध विधान*


पान : २

@ लातूर : (आंध प्रदेश)यशवंत नायक ब्यूरो 

*सगळीकडे कंत्राटी पद्धतीचा अवलंब सुरू; आरक्षण संपवण्याचे केंद्र सरकारचे मुख्य धोरण*


*लातूरात महादेव जानकर यांचा केंद्र सरकारवर घणाघाती निशाणा*


> *आरक्षण मिळवून देण्यासाठी सत्तेत पक्षाची राजकीय ताकद वाढवून देणे गरजेचे*


@ लातुर : यशवंत नायक ब्यूरो

*सत्तेची ताकद दिल्लीतच; मला लोकसभेत जायचंय : महादेव जानकर*


> *जे जे कोणी काँग्रेस भाजपच्या दावणीला बांधले ते संपले* 


@ सुरत : गुजरात यशवंत नायक ब्यूरो 

*धनगर समाज सेवा ट्रस्ट मेळाव्यात महादेव जानकर गरजले*


पान : ३

@ पुणे : यशवंत नायक ब्यूरो

*देशातील सर्व प्रादेशिक पक्ष अधिक मजबूत झाले पाहिजेत : महादेव जानकर*


> *सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन लोकसभा विधानसभेत पाठवावे*


> *पुण्यात पार पडली युवा संसद : खा. बारणे, खा. जलील, खा. तडस यांना जानकर यांच्या हस्ते पुरस्कार* 


@ करमाळा : यशवंत नायक ब्यूरो

*फोडणे, वापरणे, सोडणे हे भाजपचे धोरण.. ! महादेव जानकर यांचे करमाळा येथे टीकास्त्र*


> *येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका*


> *रासपला विचारल्याशिवाय पुढचा मुख्यमंत्री नाही*


@ मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

*वीजप्रश्नी महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक; शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे वीज बिल शासनाने भरावे*


> *महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा रासपचा खणखणीत इशारा*


@ मुंबई : यशवंत नायक ब्यूरो 

*रासप मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र जागा लढवण्याच्या तयारीत : महादेव जानकर* 


@ माझे मत माझे मन मत : यशवंत नायक वाचक पत्र

*रासपने कात टाकली : हनुमंत सुळे, एलआयसी अधिकारी यांचे पत्र*


@ बोरीवली - मुंबई : यशवंत नायक ब्यूरो 

*मस्तान ग्रुप कांदिवली आयोजित हजरत ख्वाजा गरीब नवाज उर्स सोहळ्यात महादेव जानकर यांची भेट व शुभेच्छा.*


पान : ४

@ मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

*रासेफचा मुंबईत यशवंत गुणगौरव २०२३ सोहळा थाटामाटात*


> *शून्य ते शिखर पर्यंत प्रवास करणाऱ्या मान्यवरांचा रासेफकडून सत्कार*


> *देव व धर्माचा आधार घेऊन देश व समाज विभाजित करण्याचे काम : सिद्धरामनंद स्वामी, कागीनेली धर्मपीठ*


> *देशातील बहुसंख्य जाती जमाती वर्गाला आजही न्याय मिळाला नाही : सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही ईश्वरय्या* 


@ परभणी : यशवंत नायक ब्यूरो

*ओबीसी समाजाने सत्तेकडे वाटचाल करावी : महादेव जानकर*


> *परभणीत ओबीसी हक्क परिषद दिल्ली संघटनेचा महामेळावा संपन्न*


> *महादेव जानकर यांचा भव्य नागरी सत्कार*


_*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*_

*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*

*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*

_सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक

पुकळे वस्तीस्थान

 पुकळे वस्तीस्थान

  1. बनपुरी ता - आटपाडी 
  2. पुकळेवाडी ता - माण 
  3. वलवण ता - आटपाडी
  4. घेरडी ता - सांगोला
  5. तारगाव ता - कोरेगाव
  6. गारुडी ता - खटाव
  7. विभुतवाडी ता - आटपाडी
  8. धुळे
  9. बुऱ्हाणपूर - मध्य प्रदेश
  10. पिलिव ता - माळशिरस 
  11. डफळापुर ता - जत
  12. हुबळी, कर्नाटक 
  13. टिळकवाडी, बेळगांव कर्नाटक
  14. मकत्मपुरा , कलबर्गी कर्नाटक
  15. बार्शी
  16. विजयपुर, कर्नाटक
  17. बंकापुर तालुका शीगाव जिल्हा हावेरी 
  18. सोलापूर 
  19. चींचाळे तालुका आटपाडी
  20. मारोळी तालुका - मंगळवेढा
  21. मुळीकवाडी ता - खटाव 
  22. वावरहिरे ता - माण 
  23. गटेवाडी ता- माण 



Friday, February 24, 2023

शहा मोदींकडून मित्रपक्षांना धोका देण्याचे आणि संपवण्याचे काम : सिद्धप्पा अक्कीसागर

शहा मोदींकडून मित्रपक्षांना धोका देण्याचे आणि संपवण्याचे काम : सिद्धप्पा अक्कीसागर

मुंबई : भाजपचे एकेकाळचे मित्र पक्ष असलेल्या रासप नेते महादेव जानकर यांच्या पनवेल येथील 'भाजप पासून सावध राहण्या'च्या विधानावरून देश व राज्याच्या समाज राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यातूनच पक्ष तावून सुलाखून निघेल, असा विश्वास एस. एल. अक्कीसागर यांनी यशवंत नायक जवळ व्यक्त केला.

श्री. अक्कीसागर पुढे म्हणाले,  24 पक्षाची साथ घेत अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार चालविले होते, शहा मोदी यांनी सुरुवातीपासूनच मतलब साधल्यानंतर मित्र पक्षांना धोका देण्याचे आणि संपविण्याचे काम केले. रासपाला देखील धोका दिला. युतीचा धर्म पाळण्यासाठी त्याही अवस्थेत मैत्री धर्म रासपा अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी पाळला, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाळला.  बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्यामुळेच पूर्वी आरएसएस प्रणित जनसंघाची पणती-दीप पेटले आणि भाजपचे कमळ फुलले, हे त्रिकालाबाधित सत्य कोणालाच नाकारता येत नाही. याची जाण असणारे आणि त्याचा आदर कदर करणारे तो वकुब आणि मोठेपणा असणारे स्व प्रमोद महाजन आणि स्व गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते आता भाजपात उरलेले नाहीत. आरएसएस पितामह धृतराष्ट्र बनले आहे. लोकशाही जनतंत्र धोक्यात आहे. देशाचे कुरुक्षेत्र होवू पहात आहे. 

काँग्रेस व भाजप सारख्या मोठ्या पक्षापासून सावध राहण्याचे मा. महादेवजी जानकर यांचे  विधान खूप महत्वाचे आहे.

Wednesday, February 22, 2023

आम्हाला रासपची सत्ता पाहिजे; भाजप काँग्रेसची सत्ता नको : महादेव जानकर

आम्हाला रासपची सत्ता पाहिजे; भाजप काँग्रेसची सत्ता नको : महादेव जानकर 

कोकण विभागीय पदाधिकारी मेळाव्यात रासपचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

पनवेल मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष कोकण पदाधिकारी मेळावा उत्साहात

पनवेल : |प्रा. आबासो पुकळे 

आमची स्वराज्याची लढाई आहे. मला भाजपची सत्ता नको, काँग्रेसची सत्ता नको, मला रासपची सत्ता पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर माजी मंत्री यांनी केले. पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात राष्ट्रीय समाज पक्ष कोकण पदाधिकारी मेळाव्यात आ. जानकर बोलत होते. मंचावर भूतपूर्व रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सचिव जिवाजी लेंगरे, राज्य कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब वाघ, भगवान ढेबे, रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषाताई ठाकूर आदी उपस्थित होते.

कोकण पदाधिकारी मेळाव्यात बोलताना आ. महादेव जानकर, मंचावर एस एल अक्कीसागर, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे, काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर, भगवान ढेबे, मनिषाताई ठाकूर व अन्य.

आ.जानकर पुढे म्हणाले, भाजप मुख्यमंत्री करेल त्याचा काही उपयोग होणार नाही. मुख्यमंत्री करेल आणि माईक ओढून घेईल. आम्हाला कुणाचे बाहुले बनायचे नाही, आम्हाला मालक बनायचे आहे. आमची झोपडी असेल, नसेल आमचा महाल, आमची स्वाभिमानाची झोपडी आहे. तुमचे १०७ असतील, त्यांचे ५० ह्यांचे ४०, त्यांचे २८ आहेत, आमचे दोनच आहेत, पण दोनचे दोनशे करायला वेळ लागणार नाही. पक्ष चालवण्यासाठी लोकांकडून मी पैसा घेतो, पैसे दिले तर लोक मत देतात आणि प्रेम करतात. सुदाम जरग या कार्यकर्त्याने आजवर पक्षाला २५ ते ३० लाख रुपये दिले. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या चौकात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढवली पाहिजे. २७ वर्षाचा अग्निकुंड केल्यानंतर ४ राज्यात पक्ष पोहचवला.  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड जिल्ह्यात गावागावात पक्षाध्यक्ष नात्याने पोहोचलोय, पण आपला पदाधिकारी कार्यकर्ता लोकांपर्यंत पोहोचत नाही. कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी व्हाट्सअप किंग होऊ नये. डिजिटल वर फोटो लावला म्हणजे नेता होत नाही, अशा शब्दात कार्यकर्त्यांचे महादेव जानकर यांनी कान टोचले. सर्व धर्माला, सर्व समाजाला सोबत घेऊन कोकणात पक्षाचे संघटन वाढवलं पाहिजे. पक्षात सर्वांना संधी दिली जावी. विभागावर मेळावा झाले आता जिल्हावर मेळावा घेण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीस श्री.जानकर यांनी दिले. 

आ. जानकर पुढे म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून पक्षाला कार्यालय मिळालं. पक्षाला मान्यता असल्याशिवाय कार्यालय मिळत नाही, जे आजवर उमेदवार लढले, त्यांच्या मताच्या बळावरच हे कार्यालय मिळाले. लवकरच उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील पक्षाला कार्यालय मिळेल.  दिल्लीत कार्यालय मिळवण्यासाठी सहा राज्यात पक्षाला मतदान वाढवावे लागेल. चार राज्यात मते मिळाले आहेत, यापुढे दोन राज्यात तयारी करावी लागेल. आजपर्यंत आपण भाजपबरोबर युतीत असल्यामुळे जरा अडचण झालेली. सगळीकडे आपणाला उमेदवार देता आले नव्हते. कार्यकर्त्यांनी आता हिंमतीने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. पक्षाचे संघटनात्मक काम वाढले पाहिजे. ज्या दिवशी ९० हजार पोलिंग बूथ अध्यक्षांचा मेळावा होईल, त्यादिवशी पक्ष यशस्वी होईल. लोकवर्गणीतून पक्षाला पैसाही गोळा करावा लागेल. हे फार मोठे पक्ष नाहीत, हवा केली जाते. आम्ही सोबत असो, तर सत्तेत येतील. आम्ही सोबत नसेल तर सत्तेत येणार नाहीत. कोकणात महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचे खाते उघडलं पाहिजे.  रासपचे १५ आमदार येऊ द्या, रासपला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही. कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून, काम केलं पाहिजे. एकेकाळी शेकापचे फार मोठे अधिराज्य होते, आज शेकाप कुठेही नाही. आता भाजपचेही तसेच चालले आहे.  मी २७ वर्षात समाज राजकारणात आहे बरेच पक्ष मोठे झाले. वर गेले आणि खाली आले, मला चांगलं माहित आहे. २० वर्षांपूर्वी आम्ही म्हणायचो, पंतप्रधान होऊ. आमच्यातलेच लोक म्हणायचे, यांचा सरपंच नाही आणि काहीतरी सांगतात.  चार आमदार, एक मंत्री, एक राज्यमंत्री आणि शंभरच्यावर नगरसेवकांना रासपने जन्म दिलेला आहे.

रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर म्हणाले, आपला पक्ष, आपला नेता, संघटन जपले पाहिजे. मराठेशाही, शिवशाही आणि पेशवाई यांचा ऐतिहासिक दाखला देऊन श्री. अक्कीसागर यांनी सांगितले की, पक्ष नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी शत्रूपासून सावध राहिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन करून स्वतःचा राज्यभिषेक केला, त्याचप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर महादेव जानकर यांची स्वराज्य निर्मानासाठी लढाई चालू आहे. राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाची लढाई केवळ आमदार, खासदार होण्यासाठी नाही तर राष्ट्रीय समाजाच्या हाती देशाची सत्ता ताब्यात देण्यासाठी आहे. 

कोकणात पदाधिकारी नियुक्त करावेत आणि स्वबळावर लोकसभा निवडणुका लढवाव्यात असे निर्देश देताना, कुणासोबत युती आघाडी करायची नाही, असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी निक्षून सांगितले. महासचिव ज्ञानेश्वर सलगर म्हणाले, कोकण राष्ट्रीय समाज पक्षाचा बालेकिल्ला बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पोलिंग बूथ अध्यक्ष नियुक्त करावेत. युवा नेते अजित पाटील यांनी घणाघाती भाषण करताना सांगितले की, महादेव जानकर यांच्या नेतृतवाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार तळागाळात गेला पाहिजे. गाव तेथे कार्यकर्ता आणि शाखा मोहीम राबवली तर प्रस्थपित नेत्यांचे धाबे दणाणले. मेळाव्याचे अध्यक्ष राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी सांगितले, लोकसभा, विधानसभा क्षेत्राची बुथनिहाय बांधणी करून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी करावी. 

यावेळी मेळाव्यात महादेव जानकर यांना दोन लाख रुपये नोटांचा हार घालण्यात आला. कोकण प्रदेशातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. राजेंद्र खाडे, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरद दडस, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष संपतराव ढेबे, तुषार खरिवले, संजय घाडगे, ठाणे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष एड. किशोर वरक, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेश भगत, श्रीकांतदादा भोईर, भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष हाजी जमाल अहमद अंसारी, पालघर जिल्हाध्यक्ष नितीन पेंढारी, स्वप्नील ठावरे, ललन पाल, रामधारी पाल, आण्णासाहेब वावरे, जगत घरत, देवानंद मोटे, दिपांकी जाधव, रवींद्र सुतार, एड. विलास चव्हाण, दादा डोंबाळे, बळीराम ऐनकर, प्रदीप कोचरेकर, दत्ता अनुसे, ऋषिकेश जरग, बलभीम सरक, शशिकांत मोरे, सूरज अनुसे, लहू दडस, मचींद्र मोरे, अंकुश दडस, शहाजी शिंदे, दिलीप हुंबे, रोहिदास झोरे आदी उपस्थित होते.

Thursday, February 16, 2023

महामेष योजनेसाठी ५००० कोटी रुपयांची तरतूद करावी यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रासपची मागणी

महामेष योजनेसाठी ५००० कोटी रुपयांची तरतूद करावी यासाठी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रासपची मागणी    

वीज बिल व महामेष निधी बाबत निवेदन देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना रासपचे युवा नेते अजित पाटील 

मुंबई/प्रतिनिधी 

मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री तथा वित्त व ऊर्जा मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध मागण्याणचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील यांनी दिले.

उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे प्रामुख्याने दोन मागण्या केल्या आहेत. जानकर यांच्या मागणीचे निवेदन पक्षाचे युवक अध्यक्ष अजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये महादेव जानकर पशुसंवर्धन मंत्री असताना खास धनगर समाजासाठी निर्माण करण्यात आलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेकरिता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ५००० कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी. तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे थकीत विज बिल संपूर्ण पणे माफ करावे व शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास विज मोफत देण्यात यावी ही मागणी फडणवीस यांच्याकडे केली.

   फडणवीस यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्कीच महामेष योजनेकरिता भरीव निधी देऊ व बाकीच्या मागण्याचा ही सकारात्मक विचार करू असे आश्वासित केल्याचे पाटील यांनी सांगितले.

दि. २१ रोजी पनवेल मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा

दि. २१ रोजी पनवेल मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा

पनवेल : यशवंत नायक ब्यूरो 

दिनांक २१ फेब्रुवारी वार मंगळवार या दिवशी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे दुपारी २ वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती रासपचे कोकण प्रांत राज्य कार्यकारणी सदस्य श्री भगवान ढेबे यांनी 'यशवंत नायक'शी बोलताना दिली. 

श्री. ढेबे पुढे म्हणाले, मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आ. महादेव जानकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, महाराष्ट्राचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कोकणातील जनतेने मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढवावी. मेळाव्यासाठी कोकणातील वेगवेगळ्या परिसरात गाठीभेटी घेऊन मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहोत. कळंबोली, मुंब्रा, पनवेल, करंजी आदी परिसरात बैठका पार पडल्या आहेत. मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई ठाकुर, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, राज्य शाखेचे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शरदभाऊ दडस यांच्याशी संपर्क साधावा.

Wednesday, February 15, 2023

वीजप्रश्नी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक; शेतकऱ्यांच्या पंपाचे वीज बिल शासनाने भरावे

वीजप्रश्नी राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक; शेतकऱ्यांच्या पंपाचे वीज बिल शासनाने भरावे

महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा रासपचा इशारा

मुंबई |प्रा. आबासो पुकळे , उपसंपादक यशवंत नायक 

शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर सत्ताधारी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण वीज मागण्यासाठी तहसीलदार प्रांत अधिकारी व महावितरण कार्यालवर मोर्चा काढला जाईल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे देण्यात आला आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे म्हणणे आहे की, मध्य प्रदेश सरकारप्रमाणे शेतकऱ्यांचे वीज बिल भरावे, थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतीचा वीज पुरवठा खंडित करू नये, शेतीसाठी दिवसा बारा तास वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांचे संपूर्ण थकीत विज बिल माफ करावे, शेतीसाठी मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांना बंद केलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा. अन्यथा महावितरण व प्रशासन कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कर्जत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले

सोलापूर: जिल्हाधिकारी यांना सोलापूर शहर रासप तर्फे निवेदन सादर करताना पदाधिकारी

अहमदनगर: राहुरी तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे शरदराव बाचकर, नानासाहेब जुंधारे व अन्य.

सातारा : फलटण तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते


अहमदनगर: श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

अहमदनगर: नेवासा तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.


उस्मानाबाद : तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

पुणे : इंदापूर तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते

अहमदनगर : श्रीरामपूर तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

सोलापूर : मंगळवेढा तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

पुणे : पिंपरी चिंचवड तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
अहमदनगर : संगमनेर प्रांतअधिकारी यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते

अहमदनगर : अकोले तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते

परभणी : सेलू प्रांतअधिकारी यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते

सोलापूर : पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

सातारा : दहिवडी माण तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते

लातूर: रेणापूर तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

सांगली : वाळवा तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.

सातारा : फलटण वीज महावितरण कार्यालयात निवेदन सादर करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी. 

जालना : जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते


बीड: गेवराई तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते

लातूर: उदगीर तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते
सोलापूर: मोहोळ नायब तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते
उस्मानाबाद : भूम प्रांत अधिकारी यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
पुणे : शिरूर तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते
कोल्हापूर : शाहूवाडी तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
बीड : परळी वैजनाथ तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
परभणी: सोनपेठ तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
लातूर : लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते
नागपूर: नागपूर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
उस्मानाबाद: लोहारा नायब तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते
सोलापूर : अक्कलकोट तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते. 
पुणे : पुणे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
रायगड : पनवेल तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
रायगड : उरण तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते
रायगड : पेण प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
बुलढाणा : देऊळगाव राजा तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
सांगली : आटपाडी तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
नाशिक : नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते
पुणे : बारामती तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
हिंगोली. : हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करताना राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते 
रायगड : कर्जत तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
रायगड : माणगाव तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
रायगड : कर्जत - खालापूर प्रांत अधिकारी यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.
उत्तर मुंबई : बोरीवली तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते
दक्षीण मध्य मुंबई : कुर्ला तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते

सोलापूर : माढा तहसीलदार यांना निवेदन देताना रासपचे पदाधिकारी/कार्यकर्ते.




चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...