नांदेड येथे रासपाची आढावा बैठक संपन्न
नांदेड (२५/८/२४) : रोजी रविवारी ठीक दुपारी १२.३० वाजता बंदखडके कोचिंग क्लासेस छत्रपती नगर, पुर्णा रोड नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर मार्गदर्शन करताना म्हणाले, येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्याच्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी बुथ बांधणीच्या कामाला लागावे. २९ ऑगस्ट रोजी अकोला येथे पक्षाच्या वर्धापनदिनाला प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते जास्तीच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे म्हणाले, पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमाला अकोला येथे नांदेड जिल्ह्यातून जास्तीजास्त कार्येकर्ते येतील, असे आश्वासन दिले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षापदी सौ अरूणा साखरे, नांदेड महानगराध्यक्षपदी दिपकराव कोटलवार, महानगर सचिवपदी गंगाधर होळकर यांना नियुक्तीपत्र दिले. बैठकीचे आयोजन जिल्हामहासचिव प्रा. चंद्रकांत रोडे यांनी केले होते.
No comments:
Post a Comment