Thursday, September 5, 2024

विधानसभा निवडणुकीत कोकणात महिलांना ५०% उमेदवारी

विधानसभा निवडणुकीत कोकणात महिलांना ५०% उमेदवारी


कळंबोली (४/९/२४) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. वेगवेगळे पक्ष निवडणुकीच्या मोर्चेबांधनीला लागला आहे. कळंबोली नवी मुंबई येथे महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल मिरची येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ माळी यांनी कोकणात महिलांना 50 टक्के उमेदवारी देऊ; असे जाहीर केले. श्री. माळी पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष 2024 ची विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करणार असून, राष्ट्रीय समाज पक्षाला विचारल्याशिवाय महाराष्ट्रात सरकार बनणार नाही. जातीनिहाय जनगणना, एक देश एक शिक्षण, फोफावलेली बेरोजगारी, सर्वांना परवडेल असे आरोग्य हमी आदी राष्ट्रीय समाज पक्षाने मुद्द्यावर काम केले आहे. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, महाराष्ट्र राज्य खजिनदार सुदामशेठ जरग, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस, कोकण विभाग अध्यक्ष श्रीकांत दादा भोईर, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पै. बलभिम सरक, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष बळीराम ऐनकर, कोकण महिला आघाडी नेत्या सौ. मनीषाताई ठाकूर, साहेबराव खरात, पेण विधानसभेचे इच्छुक उमेदवार प्रसाद वेदक, पनवेल  तालुकाध्यक्ष मुकेश भगत, आण्णासाहेब वावरे, मच्छिंद्र मोरे, शशिकांत मोरे, अंकुर जरग, संतोष सातपुते, प्रा. दत्ता अनुसे सर, तुकाराम जानकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...