Sunday, September 29, 2024

राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार : काशीनाथ शेवते

राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार : काशीनाथ शेवते 

नांदेड (२१/९/२४) प्रतिनिधी : महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी केले. होळकरनगर सिडको नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठकित श्री. शेवते बोलत होते. श्री. शेवते पुढे म्हणाले, आपापल्या मतदारसंघात तालुकाध्यक्षानी कार्यकर्त्यांना सोबत घेवून बुथ बांधणीच्या कामाला लागावे आणि गाव तिथे शाखा काढावेत. आपल्या मतदारसंघात इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी पक्षाकडे आपल्यामार्फत अर्ज करावेत, त्यातून पक्ष जो उमेदवार देतील त्यांना निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर म्हणाले, जो पर्यंत स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूकिच्या रिंगणात पक्ष उतरणार नाही, तोपर्यंत पक्ष मोठा होणार नाही आणि पक्ष सत्तेत येणार नाही. सत्तेत आल्याशिवाय राष्ट्रीय समाजासाठी मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, शेतकऱ्यांच्या मालाला कारखान्याचे मालाच्या धर्तीवर योग्य भाव व त्यांच्या पाल्यांना हातात काम व नौकरी तसेच उपेक्षित समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी त्यागी नेतृत्वाखाली सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणूकिच्या रणांगणात उतरण्याची तयारी करावी व राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांचे हात मजबुत करावे असे आवाहन केले. 

जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे यांनी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात उमेदवार उभे करून कमीत कमी तीन उमेदवार नक्की निवडुन आणू, असे आश्वासन दिले. मराठवाडा संपर्क प्रमुख अश्रुबा कोळेकर, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी यांनी आपापले विचार मांडले. लोहा तालुकाध्यक्ष रघुनाथ डुबुकवाड, मुखेड तालुकाध्यक्ष सुधाकर देवकाते, बिलोली तालुकाध्यक्ष मोहन मुदनकर, किनवट तालुकाध्यक्ष बाबुराव भिंगे, नांदेड शहराध्यक्ष दिपक कोटलवार यांनी आपापल्या मतदारसंघातील काय परिस्थिती आहे, याबद्दल विचार मांडले. यावेळी महाजन तुपेकर, चंद्रकांत रोडे, ज्योती कसनकर, ममता पतंगे, वनिता राठोड, गणेश राठोड, सुर्यकांत गुंडाळे, सावित्रीबाई शूरनर, सविताताई हेळगीरे, शितलताई शिंदे, गौरी देवकाते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी आयोजक महासचिव चंद्रकांत रोडे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...