सिन्नर विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष मोठ्या ताकतीने लढणार
सिन्नर (२१/९/२४) : हाॅटेल पंचवटी येथे सिन्नर विधानसभा बैठक निरीक्षक सुवर्णाताई जऱ्हाड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव राजाभाऊ पोथारे, जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण आव्हाड, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष एड. आशुतोष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत नाशिक महीला जिल्हाध्यक्षापदी सौ. मंदाताई कातकाडे यांची निवड करण्यात आली. सिन्नर महिला तालुकाध्यक्षापदी सौ.उज्ज्वलाताई तोरे यांची पुन्हा एकमताने निवड करण्यात आली. सिन्नर तालुकाध्यक्षपदी भगवान दादा आव्हाड यांची निवड तर , युवक तालुकाध्यक्ष म्हणून प्रसाद कातकाटे याची निवड करण्यात आली. तालुका संपर्क प्रमुखपदी वंसत बोडखे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्ष 288 विधानसभा स्वबळावर लढणार असून, सिन्नर विधानसभा मोठ्या ताकतीने लढणार आहे, असे प्रतिपादन निरीक्षक सुवर्णाताई जऱ्हाड पाटील यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष बुध प्रमुख, गण प्रमुख, गट प्रमुख मेळावा आदरणीय जानकर साहेब यांच्या उपस्थितीत लवकरच घेण्यात येईल. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांनी तयारीला लागण्याचे आदेश प्रदेश सचिव राजूभाऊ पोथारे यांनी दीले. जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण आव्हाड यांनी 'लवकरच सिन्नर मतदार संघात घोंगडी बैठका घेणार' असल्याचे सांगीतले. युवक अध्यक्ष आशुतोष जाधव यांनी युवकांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रीय समाज पक्षात येण्याचे आवाहन केले. या बैठकीत विधानसभा निवडणुक रणनीति, जनसंपर्क, विधानसभा मेळावा या विषयावर चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment