Sunday, September 29, 2024

राजे उमाजी नाईक जयंती निमित्त रासपने केले अभिवादन

राजे उमाजी नाईक जयंती निमित्त रासपने केले अभिवादन 

पुरंदर (७/९/२४) : भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्य पदाधिकारी पुणे जिल्हा, सातारा जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतीस्तंभास व प्रतिमेस अभिवादन केले व येळकोट येळकोट जय मल्हार, उमाजी राजे यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तत्पूर्वी सकाळी रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी समाज माध्यमातून राजे उमाजी नाईक यांना अभिवादन केले. महादेव जानकर म्हणाले, ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध राजे उमाजी नाईक यांनी सशस्त्र संघर्ष केला. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी प्राणचे बलिदान दिले. उमाजीराजे जयंती निमित्त अभिवादन करतो. भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाने राजे उमाजी नाईक यांची या देशातील पहिली जयंती साजरी केली. 

अभिवादन प्रसंगी बोलताना काशिनाथ शेवते म्हणाले, मा. महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे या देशातील पहिली जयंती साजरी करून राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली. राजे उमाजी नाईक यांचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रप्रेमी रामोशी समाजाला महाराष्ट्रात विधानसभेचे तिकीट देणारा देशातील एकमेव राष्ट्रीय समाज पक्ष आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ज्येष्ठ नेते भाऊसाहेब वाघ, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजितदादा पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफने, विनायक मामा रुपनवर, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सूनिताताई किरवे, पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...