अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रासपने आजमवले बळ
अक्कलकोट (२५/७/२४ ) राष्ट्रीय समाज पक्षाच्या अक्कलकोट तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत विधानसभा निरीक्षक अजित पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अक्कलकोट विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने आपले राजकीय बळ आजमावून पाहिले.
बैठकीत राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट तालुका पदाधिकारी निवडी व बूथ पदाधिकारी मेळावा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट शहरात गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होईल. आणि सदर मेळाव्यानंतर अक्कलकोट विधानसभा ताकतीने लढविण्याकरिता, तारीख निश्चित करून पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट शहरात भव्य मेळावा घेऊन, विधानसभेची घोषणा केली जाईल. त्या अनुषंगाने नियोजन पर बैठक संपन्न झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष विकास आलदर, सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुरके यांच्या सहित आजी-माजी जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment