विदर्भातून विधानसभा निवडणुकीत रासपच्या जास्तीत जास्त जागा निवडूण आणा : महादेव जानकर
![]() |
मेळाव्यात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, बाजूस एड. कोल्हे, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, कुमार सुशील पाल व अन्य. |
बाळापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा
बाळापूर (६ जुलै २०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आकोल्यातील बाळापूर येथे फुंकले. आपल्या पक्षाला या विभागातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब उपस्थित होते.
फुलेपिठावर राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील पाल, विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख, अकोला जिल्हाध्यक्ष गणेश मानकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य एड. कोल्हे, प्रदेश सदस्य प्रा. गिलवरकर, अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले पाटील, वाशिम जिल्हाध्यक्ष माधव दळवी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे, अकोला जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा किरण ताई, बुलढाणा जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा तारामती जायभाये, अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, युवक अध्यक्ष केशव मुळे, महानगर अध्यक्ष इमरान मिर्झा, बाळापूर तालुका अध्यक्ष प्रमोद काळे, मुर्तिजापुर शहर अध्यक्ष यश, बाळापूर शहर अध्यक्ष सोफयान सर आदी मान्यवर उपस्थित होते.
आता पुढच्या निवडणुकीसाठी माझी बारामतीसाठी तयारी चालली आहे. बारामती मतदारसंघातूनच पुढचा निकाल लागणार आहे. मी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो. नांदेड, सांगली, माढा, बारामती आणि परभणी या मतदारसंघातून लोकसभा लढलो. मात्र, पाचही ठिकाणी माझा पराभव झाला. पण माझं मतदान लाखांनी वाढत चाललं आहे. कमी होत नाही. माझा रनरेट वाढत चालला आहे”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
जानकर पुढं म्हणाले, “पक्षालाही (रासप) मान्यता मिळत चालली आहे. आज आपल्या पक्षाचा विधानसभेत आमदार आहे. विधानपरिषदेत आमदार आहे. विदर्भात आम्ही कमी आहोत. मात्र, विदर्भातील वर्धा आणि गडचीरोलीमध्ये काही जिल्हा परिषद सदस्य आहेत. वर्ध्यामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य तर गडचीरोलीमध्ये ७ जिल्हा परिषद सदस्य आहेत. अमरावती, अकोला असेल किंवा वाशिम आणि बुलढाणा या ठिकाणी आपण शून्य आहोत. लोणारमध्ये एक नगरपालिका लढवली होती. पण तेथे यश मिळालं नाही”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
बहुसंख्येने आलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भातील पदाधिकरी कार्यकर्ते यांचे स्वागत करून महादेव जानकर साहेब यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आकोल्यातील बाळापूर येथे फुंकले. आपल्या पक्षाला या विभागातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले व विदर्भातील प्रमुख शहरात आपण स्वतः सभा घेण्याचे बोलून दाखवले. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे आश्वासन देत, पूर्ण ताकदीने आपण आपले उमेदवार उभे करू असा निश्चय त्यांनी बोलून दाखवला. मेळाव्याचे सूत्रसंचालन विदर्भ अध्यक्ष डॉ. तौशिफ शेख यांनी केले.
No comments:
Post a Comment