परंडा विधानसभा मतदार क्षेत्रात स्वबळावर निवडणूक लढवण्यास राष्ट्रीय समाज पक्ष तयार
भूम (२६/७/२४) : धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे मत विधानसभा निरीक्षक एड. विकास पाटील यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक लढवण्याची इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवू.
भुम येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार व काशिनाथ शेवते प्रदेशाध्यक्ष, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, अश्रुबा कोळेकर साहेब - राज्य कार्यकारिणी सदस्य, प्रा. विष्णू गोरे- मराठवाडा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार राष्ट्रिय समाज पक्षाची परांडा विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक मानली जात आहे. या बैठकीत जय मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक उद्योजक तथा नेते नानासाहेब मदने विधानसभा निवडणूक लढवण्यास ईछूक आहेत व पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी. पक्षाने उमेदवारी दिल्यास ते निवडणूक जिंकून येतील अश्या पद्धतीने सर्व पदाधिकारी यांच्या विचाराने परंडा विधानसभा निरीक्षक ॲड विकास पाटील यांच्याकडे मागणी केली.
यावेळी एड. विकास पाटील जिल्हाध्यक्ष व निरीक्षक भूम परांडा विधानसभा यांनी वरिष्ठ यांचेकडे प्रस्ताव पाठवतो असे सांगण्यात आले. व सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पक्षाचे काम कशा पद्धतीनें पुढील काळात करायचे, कोणकोणत्या माध्यमातून पदाधिकारी रचना व कामाची विभागणी करून गावागावात वाडी वस्तीवर, शाखा विविध कार्यक्रम या माध्यमातून गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता ही संकल्पना राबवून पक्ष कशा पद्धतीनें पोहोचेल याची काळजी घेतली पाहिजे. या बैठकीत श्रीराम हाके यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. संतोष हराळ यांची युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बैठकीस नानासाहेब मदने, पंडित मारकड जिल्हा उपाध्यक्ष, गणेश जगदाळे मराठवाडा यूवक उपाध्यक्ष, गजानन सोलंकर भूम तालुका अध्यक्ष, हनुमंत वणवे तालुका उपाध्यक्ष, नानासाहेब देशमुख परंडा तालुका उपाध्यक्ष, बंडू लोखंडे तालुका संपर्क प्रमूख भूम, एड. किशोर डोंबाळे विधि व न्याय आघाडी तालुका अध्यक्ष, रवींद्र शिंदे तालुका युवक अध्यक्ष परंडा, तानाजी महानवर तालुका यूवक अध्यक्ष भुम, पिंटू देवकते कामगार आघाडी तालुका अध्यक्ष, डॉ अविनाश हांगे, युवराज हाके, सेवक हराळ, साबळे, मा सरपंच सुरेश हाके, भागवत रंगनाथ लोखंडे, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment