राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शरदभाऊ दडस यांचा आज वाढदिवस
एकेकाळी कळंबोली नवी मुंबईत रासपतर्फे शिक्षकांचा गुणगौरव करत शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याचा घणाघात करुन शरद दडस यांनी शिक्षण सम्राटांना ठणकावले होते. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची फार मोठी हेळसांड झाली. सर्वसामान्य कुटुंबातील पालकांची 'फी'च्या नावाखाली पिळवणूक सुरू होती, याविरुद्ध सर्व राजकीय पक्ष गप्प होते, मात्र रासपच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शरद दडस यांनी पालकांची बाजू घेऊन शिक्षणातील बाजारू संस्थांना चांगलेच सुनावले होते. विद्यार्थी प्रवेश प्रकियातील अडथळे दूर करावेत, शासकीय योजनातील जाचक अटी रद्द व्हावेत यासाठी शरद दडस यांनी शासन प्रशासन दरबारी निवेदने, मोर्चे, आंदोलन, निदर्शने केली आहेत. महज्योती, सारथी, बारटी संस्थानी जास्तीत जास्त मदत ही दीन दुबळ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याना करावी यासाठी शरद दडस यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी प्रवासाची मोफत सवलत ही सर्वच स्तरातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना राज्य शासनाने सुरू करावी, असा मानस शरद दडस यांनी यशवंत नायक जवळ व्यक्त केला होता.
आज घडीला बालकांच्या मोफत शिक्षण हक्क कायद्याच्या तीनतेरा वाजल्या आहेत. शासन स्तरावर आरटीईतून प्रवेश झालेल्या बालकांना अद्याप शाळेत प्रत्यक्ष प्रवेश मिळालेले नाहीत. 11 वी सह तंत्र शिक्षणातील इंजियरींग, डिप्लोमाचे, बीएडचे विलंबाने प्रवेश चालू आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठातील परिक्षा वेळेवर होत नाहीत. दहावीत कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याना प्रवेश जागा शिल्लक नसल्याची भीती दाखवून मनमानी पद्धतीने अवाच्च्या सव्वा फी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांकडून सांगितली जात आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत सामाजिक आरक्षनाची भागीदारी निश्चित करणाऱ्या बिंदू नामावलीत भटक्या विमुक्त जमातींच्या जागा शून्य दाखवण्याचे महापाप राज्यातील शिक्षण संस्थानी केलेले आहे, नोकर भरतीत मागासर्गीयांच्या जागा कमी दाखवल्या आहेत, याविरुद्ध एकूणच राष्ट्रीय समाज पक्षाने लक्ष घालने आवश्यक बनले आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष ताकद पणाला लावून राष्ट्रीय समाजाचे प्रश्न मार्गी लावतील अशी आशा बाळगुया. शिक्षण वाचले तर राष्ट्र वाचेल. शिक्षण वाचवन्यासाठी बाजारू सम्राटांना लगाम लावण्याचे काम शरद दडस यांची राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी करेल, असा आशावाद वाटतो.
राष्ट्रीय समाज पक्षाचा शिस्टाचार पाळणारा शिस्त प्रिय कार्यकर्ता ते विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष असा शरद दडस यांचा आजवरचा राजकीय प्रवास सुरू आहे, त्यांचे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आयुष्य फुलत जाऊन सर्वच क्षेत्रात भरभराटी व्हावी यासाठी यशवंत नायक परिवाराकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!
- शेफर्ड ए. पी, मुंबई.
8- 8-2024
No comments:
Post a Comment