Tuesday, August 27, 2024

राष्ट्रीय समाज पक्षाची विदर्भ पदाधिकारी यांची नागपूरात बैठक

राष्ट्रीय समाज पक्षाची विदर्भ पदाधिकारी यांची नागपूरात बैठक

अकोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा २१ वा वर्धापनदिन होणार साजरा

नागपूर (२०/७/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भातील पदाधिकारी यांची बैठक आमदार निवास नागपुर येथे दुपारी दोन वाजता पार पडली. राज्य कार्यकारणी सदस्य नानासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाचे बैठकीत निर्णय घेण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचा विसावा वर्धापनदिन मराठा समाज भवन येथे 29 ऑगस्ट 2024 रोजी पार पडणार आहे. वर्धापन दिनाच्या तयारीसाठी जोमाने कामास लागण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर तोसिफ शेख यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन विदर्भात होत आहे त्यामुळे त्यासाठी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व अध्यक्ष महासचिव संयोजक संघटक यांनी प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मिळावे घ्यावेत. राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा महात्मा फुलेवादाची आहे. या देशातील उपेक्षित राष्ट्रीय समाजाला ओबीसी, अतीमागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याची भूमिका रासपची आहे. या देशात जातीने या जनगणना करावी अशी सर्वप्रथम मागणी राष्ट्रीय समाज पक्षानेच केली होती. जनगणनेची मागणी आता सर्वच राजकीय पक्ष करत आहेत.  1931 ला ब्रिटिशांनी जनगणना केली होती. तेव्हापासून आतापर्यंत सर्वच प्रस्थापित सत्ताधारी सरकारने दुर्लक्ष केले आहे. 

2011 मध्ये देशात संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार असताना देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी देशातील प्रत्येक राज्यात जनगणना करण्यात येईल ही भूमिका संसदेमध्ये ठेवण्यात आली होती तसे अध्यादेश सुद्धा केंद्र सरकारने काढले होते पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर 2018 पासून सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. दिल्लीच्या जंतर-मंतरवर राष्ट्रीय समाज पक्षाचे संसद भवनाबाहेर जनगणना व्हावी, यासाठी आंदोलन पार पडले. त्यावेळी देशातील विविध राज्यातील लोकांचा सहभाग होता. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जातीनिहाय जनगणना तातडीने सुरू करण्यात ही मागणी रेठून धारावी, शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळावा, हमीभाव न देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांना व कंत्राटी कामगारांना सरकारी सेवेत कायम करावे, स्थानिक मागण्यांना जोर देण्यात यावा. रासप पक्ष वंचित समाज घटकांना, ओबीसींना न्याय देणार आहे, त्यामुळे ओबीसीसाठी रासप पक्ष पर्याय आहे, असे मत विदर्भ महसचिव संजय कन्नावर यांनी मांडले. विदर्भ संयोजकपदी प्रा. राजू गोरडे, नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दत्ता मेश्राम यांची निवड करण्यात आली. उपस्थितांचे आभार दादाराव ढगे यांनी मानले. बैठकीला विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...