Tuesday, August 27, 2024

राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा एकमेव पक्ष

राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा एकमेव पक्ष


बीड (२२/७/२४) : प्रतिनिधी गुरुपौर्णिमा निमित्त पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे श्री साईबाबा मंदिर या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहून रासपचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी साईबाबांचा आशीर्वाद घेतला. भक्तांना मार्गदर्शन केलं.

राष्ट्रीय समाज पक्षात सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र काम करतात. त्यामुळे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा हा एकमेव पक्ष आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन पक्षाचे गाव गाड्यावर काम वाढवले. सर्वसामान्य माणसांना न्याय राष्ट्रीय समाज पक्षाने दिला. गाव ते शाखा व घर तिथे कार्यकर्ता ही मोहीम हाती घेतली. 70 टक्के पक्षाची बांधणी झाली आहे, त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवणार आहे. सर्वसामान्य लोकांचा प्रस्थापित पक्षावर कुठलाही विश्वास राहिलेला नाही. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाला ताकद द्यावी. राष्ट्रीय समाज पक्षांच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं पाहिजे. मोठे लोक आपले काम करत नाहीत, आणि आपण निवडणुका जवळ आले की त्यांचाच ऐकतो, त्यामुळे यावेळेस आपणास बदल करण्याची संधी आलेली आहे असे मत जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब मतकर यांनी कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केले आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. 

यावेळी श्रीमती कविता राईस तालुका अध्यक्ष रासपा पाटोदा, श्रीमती सुरेखा बेद्रे तालुका उपाध्यक्ष पाटोदा, श्रीमती अनिता महारनवर तालुका सचिव पाटोदा, श्री विकास घुगे अमळनेर सर्कल प्रमुख, श्री अशोक शिंगटे अमळनेर गणप्रमुख, श्री बाळासाहेब आसराची सानप सौताडा गणप्रमुख, श्री मिसाळ गहिनीनाथ व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष परशुराम काशीद, तालुका अध्यक्ष पाटोदा आसाराम महानोर युवक तालुका अध्यक्ष पाटोदा कल्पेश भोंडवे, एड. बाळासाहेब सोलनकर, भाऊसाहेब दिंडे आष्टी तालुका अध्यक्ष, आष्टी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भिसे, पत्रकार अंकुश गवळी, संस्थेचे चालक श्री.धनवटे, तसेच सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...