ओबीसीकडे राजकीय दल नसल्याने देशाच्या व्यवस्थेत ओबीसी बेदखल : महादेव जानकर
अमृतसर येथे ९ व्या अधिवेशनात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर |
अमृतसर पंजाब येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन पार पडले
अमृतसर/पंजाब (७/८/२०२४) |✍️पी. आबासो : भारतात बहुसंख्यांक लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीकडे देशाच्या राजकारणात ताकदवान दल नसल्याने देशाच्या व्यवस्थेत ओबीसी बेदखल आहेत, अशी खंत व्यक्त करत 'ओबीसींना दखलपात्र बनवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे दल स्वत:च्या हिंमतिवर उभे करत असल्याचे' प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले. मंडल दिनानिमित्त अमृतसर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात महादेव जानकर बोलत होते. यावेळी मंचावर महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे, माजी खा. राजकुमार सैनी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, अशोक जिवतोडे व अन्य उपस्थित होते.
अधिवेशनास देशभरातून उपस्थित राहिलेल्या जनतेस मंचावरून अभिवादन करताना मान्यवर. |
महादेव जानकर घणाघाती भाषणात म्हणाले, ओबीसी समाजावर सर्व ठिकाणी अन्याय झालेला आहे, जोपर्यंत ओबीसीचे संघटन मजबूत होणार नाही, तोपर्यंत देशातील कोणतीही राजकीय पार्टी आपल्याला विचारणार नाही, केवळ वापरून फेकून देतील. हे लक्षात ठेवले पाहिजे. मी सांगू इच्छितो, मंडल कमिशन कोणत्या काळात सुरू झाले आणि कोणत्या काळात लागू झाले?, इथे काँग्रेसचे किरसान नाहीत. व्ही. पी सिंगचे सरकार कोणी पाडले.? ओबिसी समाजाच्या जीवावर पार्लमेंटमध्ये बिल आणल तेव्हा सरकारचे समर्थन कुणी काढले? याचा विचार झाला पाहिजे. आजही आम्ही पंजाबमध्ये ओबिसीचे काम करत आहोत, पण इथेही ओबिसीला आरक्षण नाही. आजपर्यंत भारतावर कोणाचे राज होते? हेही आम्ही ठरवलं पाहिजे.
दोस्त हो, जोपर्यंत ओबीसींचा संघटन उभे राहत नाही, मोठं होत नाही, तोपर्यंत कोणताही मोठा राजकीय पक्ष आपल्याला विचारणार नाही, कोणतीही भागीदारी देणार नाही. संख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळाली पाहिजे, अशी आपली घोषणा असायला हवी. ओबीसीकडे दल नाही, म्हणून ओबीसी बेदखल आहे. दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी होत नाही, तोपर्यंत कोणतेही काम होणार नाही. डॉ. तायवाडे सर शाहू, फुले, आंबेडकर नंतर ओबीसीला जागृत करण्याचे काम चांगल करत आहेत. त्यांच्यासारखा माणूस संसदेत पाहिजे, तरच ओबीसीचे हीत जास्त होईल. एनडियाच्या सभेत ओबीसीला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे. ओबीसींच्या नावाने मत मागता, मग ओबीसीला संविधानात्मक दर्जा का नाही? असे मोदींना बोललो. ७० वर्ष झाले, ओबीसीला संविधानात्मक दर्जा दिला नाही, कोणी दिला नाही? कोणी रोखला होता..? आम्ही तर रोखला नाही? रोखणारे कोण होते आणि हटवणारे कोण होते याचा विचार आम्ही केला पाहिजे?
आम्ही कोणत्याही पक्षाचा नाही. ओबीसी पक्ष घेऊन देशभर उभारत आहे. मी ओबीसी समाजातून येत आहे. काँग्रेस, भाजपचा नाही, हे सांगण्यासाठी आलो आहे. ओबीसी चे आमदार खासदार किती आहेत? न्याय पालिकेत काय अवस्था आहे. ६०% असुन सुध्दा आपण दुसऱ्याकडे पदाची भिक मागताय. मागून काही मिळणार नाही, स्वत: हिसकावून घ्यायची तयारी करावी लागेल. कपडा, घर, रोजगार कोणीही देईल, पण राजसत्ता कोणी देणार नाही, राजपाट घ्यायचा असेल तर स्वबळावर मिळवा, असे गुरू गोविंद सिंगांनी सांगितले आहे. आमचे आयएस, आयपीएस किती आहेत? ओबीसीचे मुख्यमंत्री बनतो, मंत्री बनतो,पण कुणाचा तरी बाहुला बनतो. ओबीसीचे मुलगा, मुलगी प्रत्येक क्षेत्रात पुढे येणार नाही, तोपर्यंत तुमचे ऐकले जाणार नाही. एससी, एसटी आमचे भाऊ आहेत, त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत, पण ओबीसींना आजपर्यंत का मिळाले नाही, याचा विचार करावा. आम्ही प्रथम ओबीसी आहोत. जिथे बोलवा तिथे आम्ही येऊ. या देशावर ओबिसिंचे राज आले पाहिजे. आपल्याला देशाचे तकदीर बदलायचे आहे. जेव्हा आम्ही सत्तेत बसू तेव्हा महात्मा फुले, सावित्रीबाईं फुले यांना भारतरत्न देऊ शकू. शासन, प्रशासन, न्यायपालिका, प्रसार माध्यमांत सहभाग वाढला पाहिजे. क्रिमीलेयर हटवले पाहिजे. जोपर्यंत तुमचा मुलगा देशात पंतप्रधानाच्या खुर्चीत बसणार नाही, तोपर्यंत हे होणार नाही. आरएसएस काम करते म्हणून सत्ता येते. ओबीसीनी मिशनरी बनून काम केले पाहिजे.
No comments:
Post a Comment