मोहोळ विधानसभा मतदार क्षेत्रात रासपचा उमेदवार असणार
मोहोळ (२६/७/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित मिशन महाराष्ट्र राज्य विधानसभा -2024 अंतर्गत मोहोळ येथे पदाधिकारी बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांनी मार्गदर्शन केले. रासपच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रात निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार उभा करणार आहे. लवकरच मोहोळ येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी मोहोळ विधानसभा निरीक्षक परमेश्वर पुजारी, मोहोळ तालुका अध्यक्ष अनिल महाळनोर, मोहोळ शहराध्यक्ष बंडू देवकते, तालुका युवक अध्यक्ष संजय गाढवे, जिल्हा सचिव अभिमान काळे, जिल्हा सरचिटणीस नागेश हजारे, ज्येष्ठ नेते भुजंग मळगे, राम लांडगे, सुनील मोरे हनवते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment