देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश कार्यालयाचे उद्घघाटन
मुंबई (४ जुलै २४) : महापालिका मार्ग, आझाद मैदान, फोर्ट मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य एस. एल. अक्कीसागर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे विधीमंडळ गटनेते आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे, रासपचे राष्ट्रीय संघटक ज्येष्ट नेते गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार होते, मात्र पुढील कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत, त्यांनी सकाळीच फोन करून शुभेच्छ्या दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येणार आहेत, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली.
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जानकर साहेब हे समाजातील वंचीतांकडे सातत्याने लढा देत आहेत. धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल सर्वांच्या पाठीशी जानकर साहेब ताकदीने उभे राहतात. समर्पित अशा प्रकारचे नेतृत्व असल्यामुळे मी त्यांना शुभेच्छ्या देण्याकरिता या ठिकाणी आलोय. मला आनंद होतोय की आज त्यांच्या कार्यालयाचे उद्घघाटन झालेय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, हरणाई उद्योग समूहाचे रणजितसिंह देशमुख व अन्य नेत्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या नवीन कार्यालयाला भेट देऊन पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांना शुभेच्छ्या दिल्या.
No comments:
Post a Comment