छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! *कारण;*
*स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - गेल्यानंतर) आपल्या समाजाचे, बहूजन राष्ट्रीय समाजाचे काय स्थान असेल, यामुळे परेशान असणारा छ. शाहू राजा हा एकमेव राजा आहे.*
छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! कारण स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - गेल्यानंतर) आपल्या समाजाचे, बहूजन राष्ट्रीय समाजाचे काय स्थान असेल, यामुळे परेशान असणारा छ. शाहू राजा हा एकमेव राजा आहे.
इंदूरचे होळकर, ग्वालेरचे शिंदे, काश्मिरचे हरीसिंग, हैद्राबादचे निजाम वगैरे राजे - नवाब वगैरे आपल्या संस्थानाचा- - तनख्याचा विचार करीत होते. परंतु 'स्व' समाजाच्या किंबहूना 'स्व' राज्याच्या प्रश्नावर काहीसे उदासिन होते. असा इतिहास असताना 'शाहू राजा'चे वैशिष्ट मात्र आगळे-वेगळे आहे. 'स्व' संस्थानाच्या स्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात ' (ब्रिटीश गेल्यानंतर) 'स्व' समाजाचे, बहूजन राष्ट्रीय समाजाचे दलीत, शोषित, उपेक्षित दुर्लक्षित समाजाचे काय स्थान असेल यामुळे परेशान असणारा एकमेव भारतीय राजा म्हणजे छ. शाहू राजा होय.
यशवंतराव घाटगे अर्थात छत्रपती शाहू महाराजा यांच्या जन्म राजा 26 जुन 1874 रोजी अप्पासाहेब घाटगे यांच्या पोटी कागल - कोल्हापूर येथे झाला. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती 4थे शिवाजी यांची विधवा पत्नी आनंदीबाई यांनी मार्च 1884 मध्ये
यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले. 2 एप्रिल 1894 रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे राज्यरोहण झाले, ते कोल्हापूरचे छत्रपती झाले. आपल्या वाढदिवसाच्यानिमित्त 26 जून 1894 रोजी छत्रपती शाहू राजा यांनी एक ऐतेहासिक जाहीरनामा काढला, तोच या देशातील मागासलेल्या समुदायांसाठी - जाती जमाती धर्म अलुतेदार बलुतेदार वर्गासाठी (50% टक्केचा ब्राह्मण शेणवी, प्रभू आणि ज्यू पारसी वगळून ) पहिला आरक्षण जाहीरनामा - कायदा जाहीर केला. अंमलबजावणी केली. ब्रिटशकाळी भारताचे स्वातंत्र्य आणि सत्तेत सामाजिक भागीदारी हे दोन सर्वात मोठे मुद्दे होते. त्याकाळी छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक भागीदारी देणारा देशातील पहिला कायदा क्रांतिकारी ठरतो. आज महाराष्ट्र आणि देशात सामाजिक आरक्षण मुद्दा किती महत्वाचा आणि गंभीर बनला आहे, हे मराठा ओबीसी या आरक्षण मुद्द्यावरून स्पष्ट झाले आहे. छत्रपती शाहू महाराज यांची 26 जून 2024 रोजी 150 वी जयंती आहे. हा दिवस एखाद्या सणासारखा सारखा साजरा करा, स्वतंत्र भारतातील एससी/ एसटी प्रतिनिधित्व राज्यघटनेद्वारे लागू करणारे आद्य शाहू राजा असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा वजा शब्द फुले माला अर्पण करीत आहोत.
महात्मा जोतीराव फूले पारतंत्र्यात 'स्व' समाजाचे 'स्थान' निर्माण करीत होते. डॉ. भिमराव आंबेडकर ब्रिटीश काळात 'स्व' समाजाचे स्थान निर्माण काळात 'स्व' समाजाचे स्थान निर्माण करीत होते. ब्रिटीश गेल्यानंतर निर्माण झालेल्या 'सत्ता' पोकळीत सत्ता स्थानावर आपल्या समाजासाठी 'स्थान' आरक्षित करीत होते. त्यासाठी ब्रिटीश ब्राह्मण-बनीया आणि आपल्या अज्ञान आणि अलायक समाजाशी संघर्ष करीत होते. त्याचवेळी जनाब मोहमद अली जीना कार्यरत होते. 'स्व' समाजासाठी मुसलमानांसाठी केवळ आरक्षित स्थान नव्हे "पाकिस्तान' मागत होते. नव्हे त्यांनी पाकीस्तान निर्माण केले मिळविले. याच वेळेस तमाम हिंदू समाजासाठी भारतीय समाजासाठी, मराठा- धनगर - ओबीसी - आदीवासी - दलित - अल्प संख्या समाजासाठी 'स्व' समाजासाठी अर्थात ब्राम्हण बनीया बड़ा - जमीनदार (नव-क्षत्रिय) वर्गासाठी 'स्व' राज मिळवीत आहोत असा दावा गांधी-नेहरू-पटेल करीत होते.
परंतु गेल्या ५० वर्षाचा इतिहास काय सांगतो. तमाम हिंदू समाजासाठी भारतीय स्वातंत्र्यातून 'स्व' राज्य मिळाले का? 'स्व' राज्यातून राजसत्ता (राजकीय) अर्थसत्ता (आर्थिक) ज्ञानसत्ता शैक्षणिक आणि प्रतिष्ठा धार्मिक, सांस्कृतीक, सामाजिक मिळाली का?
हिंदू समाजांतर्गत प्रगतिची 'समान' संधी मिळाली का? समाजाची सम-समान प्रगती झाली का ? याचे उत्तर केवळ नाही असेच येते. किंबहूना हिंदू समाजांतर्गत स्वातंत्र्यापूर्वी असलेली विषमता, किमान शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकिय (शासकीय प्रशासकीय) कमी झाली कि वाढली ? या प्रश्नाचे उत्तरं काय येते ?
वरवर ठोकळपणे भारतीय समाजाच्या प्रगतीचे कोष्टक स्पष्टपणे "विषमताच स्पष्ट करते. नीट पाहील्यास गरीब आणि श्रीमंत यामध्ये फार मोठी तफावत दिसते. दारिद्र्य रेषेखाली जाणाऱ्याची संख्या 'स्व' राज्यात वाढलीच आहे. याचा अर्थ छ. शाहू महाराजांनी जी भीती शंका व्यक्त केली होती (२०व्या शतकाच्या सुरुवातीला) ती भीती शंका खरी ठरली.
शाहू म्हणाले होते, "मी स्वराज्याच्या (स्वातंत्र्याच्या) विरोधी कदापि नाही. परंतु माझा समाज माझा मागासवर्गीय समाज (मराठा, धनगर, माळी, महार, मांग आदि) शैक्षणिक आणि राजकिय पातळीवर जागृत होत नाही. तोपर्यंत लोकमान्य टिळकांचे "स्वराज्य'" फक्त उच्च वर्णीयासाठी सिमीत राहील. जो पर्यंत माझा समाज शिकून सवरून शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या जागृत होत नाही तो पर्यंत स्वराज्याचे माझ्या समाजाच्या लेखी महत्व राहत नाही.
तसेच ब्राम्हण, बनिया, ठाकूर विरहीत हिंदू समाजाने ज्यांच्यावर "विश्वास ठेवला ते विश्वासास पात्र ठरले नाहीत. गेल्या ५० वर्षात जे लोक प्रतिनिधी निवडून गेले, जे पक्ष सत्ताधारी होते, जे प्रशासनात नेमले गेले ते सर्व भारतीय समाजासाठी हिंदू समाजासाठी "विश्वास घातकी' असे नेतृत्व (राजकीय व बौध्दीक ) ठरल्याचे सिध्द होते. छत्रपती शिवाजी वारसास शाहू राजा यांनां शूद्र ठरविणारे वेदोक्त - पुरणोक्त प्रकरण, शाहू - टिळक संघर्ष आणि क्षात्र जगतगुरूची स्थापना हा केवळ थरारक इतिहास ठरतो. आरक्षण धोरणामुळे शिक्षण आणि त्यातून शासन प्रशासनात बहुजन राष्ट्रीय समाजाचा वाढता सहभाग पाहून शाहू यांना हिनवत लोकमान्य? बाल गंगाधर टिळक अथणी बेळगाव येथे म्हणाले, पार्लमेंटमध्ये जाऊन कुणाब्यांना काय नांगर चालवायचा आहे काय? कानपुर उत्तर प्रदेश येथे कुर्मी - कुणबी महासभेने छत्रपती शाहू महाराज यांना सन्मानाने राजर्षी हीं पदवी देऊन गौरव केला होता. काँग्रेस प्रणित रानडे, टिळक, गोखले, केळकर यांनी शाहू महाराज यांचा प्रखर विरीध केला. गांधी गुरू गोखले यांनी शाहूना काँग्रेस प्रवेशाची ऑफर हीं केली होती. परंतु राजांनी ती स्पष्ट नाकारली. महात्मा फुले यांचा सार्वजनिक परिवर्तनाचा प्रबोधनाचा वैचारिक वारसा छत्रपती शाहू महाराज यांनी चालवीला. आपल्या राज्यात राबविला. 50% आरक्षणसहित सर्वाना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा दुसरा क्रांतकारक निर्णय होता. बालविवाह बंदी, विधवा विवाह, आंतर्जातीय -धर्मीय विवाह संमती कायदा, अप्रूश्यता प्रतिबंधक कायदा सारखे क्रांतिकारी कायदे शाहू राजांनी राबविले. शाळा, विद्यालय, आश्रमशाळा उभारल्या. प्रबोधनकारी साहित्य निर्माणासाठी निधी पुरवीला. डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मित मुकनायक या पत्रकाला 2000 रुपयाची देणगी दिली. (त्याकाळी खूप मोठी रक्कम. प्रबोधबाकर ठाकरे सहित अनेक ग्रंथाकारांना साहाय्य केले ) एवढेच नाहीतर माणगांव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना येथून पुढे तुमचा आमचा पुढारी घोषित केले. राज्य घटनेतील सहभागातून हे नेतृत्व सिद्ध झाले. फुले - शाहू यांना - त्यांच्या खऱ्या विचाराला महाराष्ट्र आणि त्यांचे पुढारी आज विसरले आहेत, म्हणून सामाजिक आणि राजकीय गोंधळ चालू आहे. फुले - शाहू - आंबेडकर यांना - त्यांच्या खऱ्या विचाराला समजून उमजून पुढे चालणे, हीच या महापुरुषांना श्रद्धांजली ठरेलं.
शब्दांकन : मल्हारभारती अर्थात एस. एल. अक्कीसागर
(तब्बल 24 वर्षापूर्वी आपल्या यशवंत नायक : मार्च-एप्रिल 2000 या अंकात प्रस्तुत लेख पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. त्याचा पुनः संपादित - सुधारित लेख आम्ही या अंकातून पुन्हा प्रकाशित करीत आहोत. 26 जुन 2024 छत्रपती शाहू राजा 150 वी जयंती निमित्त यशवंत नायक परिवार तर्फे शुभेच्छ्या..!)
No comments:
Post a Comment