Tuesday, August 27, 2024

रासपाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांचा कर्नाटक, तेलंगणा दौरा

रासपाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांचा कर्नाटक, तेलंगणा दौरा 

बेंगलोर : अनुप रेवन्ना यांच्या विवाहसोहळ्यात डावीकडून एस. एल. अक्कीसागर, भुवाजी अर्जुनभाई देसाई (राजस्थान), उत्तर प्रदेश माजी राज्यमंत्री सतिश पाल.

बेंगलोर, यादगीर : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य तथा भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर हे दिनांक १९ ऑगस्ट २०२४ पासून कर्नाटक, तेलंगणा दौऱ्यावर होते. बेळगावहून अक्कीसागर हे बेंगलोरच्या दिशेने रवाना झाल्याबाबत यशवंत नायकशी बोलताना सांगितले होते. कर्नाटकचे माजी मंत्री तसेच शेफर्डस इंडियन इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष मा. एच. एम. रेवन्ना यांचे सुपुत्र सिने अभिनेता अनुप रेवन्ना यांच्या विवाहसोहळ्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे खास प्रतिनिधी म्हणून श्री. अक्कीसागर उपस्थित राहिले. विवाहसोहळ्यास देशभरातील विविध स्तरातील अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार, शेफर्डस इंडियन इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष एच. विश्वनाथ, केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल, राजस्थानचे आमदार रतन देवासी, माजी राज्यमंत्री सतिश पाल, अर्जुनभाई देसाई, कनक पिठाचे स्वामी श्री निरांजनांदपुरी, सिद्धरामानंदपुरी सहित अनेक मान्यवर उपस्थित होते. यजमान रेवन्ना यांच्यापासून अनेक नेत्यांनी आणि समाज बांधवानी मा. महादेव जानकर यांची आठवण काढली. श्री. अक्कीसागर यांनी कर्नाटक व देशभरातील लोकांशी सामाजिक व राजकीय चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष आणि रासेफ संबंधी चर्चा करण्यात आली. देशभरातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक जणांनी नेतृत्व महादेव जानकर आणि पक्षांबद्दल कुतूहूल व्यक्त केले, अनेक लोक पक्षात येण्यास इच्छुक झाले. 

यादगीर : येथे एस. एल. अक्कीसागर समवेत तेलंगणा प्रांत अध्यक्ष रमाकांत करगतला व अन्य

त्यानंतर पुढे अक्कीसागर हे यादगिर येथे रासपचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष देवानंद कोळी यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले. कर्नाटक रासपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. मा. अक्कीसागर यांच्या उपस्थितीत यादगिरी येथे राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. बैठकीत अक्कीसागर यांच्यासमोर कर्नाटक रासप पदाधिकारी यांनी आपली बाजू आणि अपेक्षा व्यक्त केली. पक्षाची विचारधारा आणि तत्व अजेंडा बद्दल माहिती नीट मिळत नसल्याची तक्रार नोंदवली. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आपली दखल घेत नसल्याचे सांगितले. पक्ष वर्धापन दिन कार्यक्रमाबद्दल विचारपूस झाले नसल्याचे सांगितले. सर्वांचे म्हणणे ऐकून अक्कीसागर म्हणाले, सर्वापेक्षा राष्ट्र मोठे मानणाऱ्या सर्व जाती धार्मियांचा राष्ट्रीय समाज हा आहे. सर्वांनी अकोला येथे पक्ष वर्धापन दिन कार्यक्रमास येण्याचे आवाहन केले. कर्नाटक राज्य राष्ट्रीय समाज पक्ष विस्तार करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी कर्नाटकात मा. सिद्धरामय्या यांच्या नंतर महादेव जानकर यांच्याकडे नेता म्हणून पाहिले जात असल्याची तशी लोकांमध्ये चर्चा असल्याचे दिसून आले. या बैठकीस सिद्धराज किन्नुर, धर्मन्ना तोंटापुर, बसवराज दोडामणी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कर्नाटक दौरा आटोपून अक्कीसागर तेलंगणा राज्य दौऱ्यावर निघाले असता, नांदूर जिल्हा विकाराबाद तेलंगणा येथील नियोजित बैठक पाऊसामुळे वेळेत होऊ शकली नाही. तेलंगणा राज्य अध्यक्ष रमाकांत करगतला सदर ठिकाणी पाऊस आणि वाहतूक ठप्पमुळे दुपारी १ वाजता येण्याऐवजी ३ : ३० वाजता यादगीर येथे पोहचले. नांदूर येथे लोक अक्कीसागर यांची वाट पाहत होते. पुढे हैदराबाद येथील बैठक ही ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. नांदूर व हैदराबाद येथील बैठक सप्टेंबर महिन्यात एस. एल. अक्कीसागर यांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले. तेलंगणा रासप कार्यकारिणीची बैठक यादगीर येथेच घेण्यात आली.

एस. एल. अक्कीसागर समवेत कर्नाटक प्रांत अध्यक्ष धर्मन्ना तोंटापुर, तेलंगणा प्रांत अध्यक्ष रमाकांत करगतला व अन्य रासप नेता.


No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...