शेतकरी, शेतमजूर, युवक, कामगार, माताभगिनी पर्यंत रासपची भूमिका पोहचवा : महादेव जानकर
घनसावंगी : (६/८/२३) यशवंत नायक ब्यूरो
शेतकरी, शेतमजूर, कामगार युवक, माता भगिनी यांच्यापर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका गेली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. घनसावंगी जिल्हा - जालना येथे जन स्वराज यात्रेत मार्गदर्शन करताना आ. जानकर बोलत होते.
आ. जानकर पुढे म्हणाले, प्रमूख पदाधिकाऱ्यांनी अठरापगड जाती जमातीच्या सर्वच समाजाच्या लोकांना राष्ट्रीय समाज पक्षात स्थान देण्यात यावे. जन स्वराज यात्रेचे सर्वजाती धर्माच्या लोकांनी परभणी लोकसभा मतदारसंघात स्वागत केले. आजचे जेवण मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांने दिले. शेतकरी, शेतमजूर, कामगार युवक, माता भगिनी यांच्यापर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका गेली पाहिजे. गावागावात तळागाळापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोहोचले पाहिजे. सारेच काम पैशावर होत नाही. पक्ष मोठा असतो. पक्षावर प्रेम करायला शिका, तरच उद्याचे दिवस चांगले येतील. जनतेची सामाजिक, आर्थिक प्रगती व्हावी. जनतेला हुशार बनवावे, यासाठी जनस्वराज यात्रा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जनस्वराज यात्रेचा प्रचार प्रसार करावा. रासप अध्यक्ष महादेव जानकर हैदराबाद येथे जाणार असल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न होईल,असे जाहीर करून आंध्रप्रदेश राज्याच्या दौऱ्यावर रवाना झाले.
या सभेत राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, अश्रुबा कोळेकर, ओमप्रकाश चीतळकर, प्रा. विष्णू गोरे, अशोक लांडे, गजानन वायसे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment