Saturday, August 5, 2023

परभणी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे जन स्वराज यात्रेस तुफान प्रतिसाद

परभणी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे जन स्वराज यात्रेस तुफान प्रतिसाद 

परभणी/यशवंत नायक वार्ताहर वेदांत कुलकर्णी|  आज दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाने परभणी लोकसभा मतदार क्षेत्रात जन स्वराज यात्रेस प्रारंभ केला.  माढा लोकसभा मतदार क्षेत्रातून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार क्षेत्रात पुढे मुंबईतील ६ लोकसभा मतदार क्षेत्रात जन स्वराज यात्रा पार पडल्यानंतर आज परभणी लोकसभा मतदार क्षेत्रात जन स्वराज यात्रा आली आहे. रासपच्या जन स्वराज यात्रेस नागरिकांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे. 

ठिकठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांचे फटाके वाजवून स्वागत केले जात आहे. शेकडोंच्या संख्येने नागरिक हातात पुष्पगुच्छ, फुलांचा हार घेऊन आ. जानकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेचे स्वागत करण्यासाठी रसत्यावर थांबल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप - महायुती सोबत न जाता महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याविषयी आक्रमक पवित्रा घेतला आहे. परभणी लोकसभा मतदार क्षेत्रात आ. जानकर यांनी निवडणुक लढवावी असे येथील स्थानीक पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक केली आहे. लोकसभा जन स्वराज यात्रेत राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल. अक्कीसागर, राष्ट्रिय सरचिटणीस कुमार सुशील, गोविंदराव शुरणार, प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, अभीमान मानवतकर, जाफरखान पठाण, ज्ञानेश्वर सलगर, राजेभाऊ फड,  आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...