Saturday, August 19, 2023

घराणेशाहितील प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देण्यासाठी जनतेला पुढे यावे लागेल

घराणेशाहितील प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देण्यासाठी जनतेला पुढे यावे लागेल : रासप सुप्रीमो महादेव जानकर 

मतदारांनी आपले मतदान विकले नाही पाहिजे : महादेव जानकर

कर्जत : (२३/७/२३)यशवंत नायक ब्यूरो 

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी सत्ताधाऱ्यांना काहीच देणे घेणे नाही, आपली सत्ता आणि आपली खुर्ची कशी टीकेल यावर सध्या राजकारणात जास्त भर दिसत आहे. खासदार आमदार विकणार नाही अशी अपेक्षा मतदार करीत असेल तर मतदारांनी देखील आपले मतदान विकले नाही पाहिजे अशी धरणा अगोदर निर्माण करण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे. प्रस्थापितांना, सत्ताधाऱ्यांना धक्का द्यायचा असेल तर मतदारांनी सुज्ञ राहून मतदान करावे. मत अधिकारद्वारे सत्तेत परिवर्तन घडवून लोकशाही जागृत ठेवावी, असे आवाहन रासपचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. कर्जत येथे जन स्वराज यात्रेत उपस्थितांसमोर आ. महादेव जानकर बोलत होते. 

पुढे बोलताना आ.जानकर म्हणाले, रासप पक्षाची स्थापना कर्जत जामखेड मतदारसंघात झाली. आज या भूमीत सभा होत आहे याचे समाधान आहे. पण येथील जनता आपल्याला सहकार्य करीत नाही ही शोकांतिका देखील आहे. जन स्वराज यात्रा सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधण्यासाठी काढली आहे. अनेक राजकीय पक्षांनी सत्तेत येण्यासाठी गरीबी हटावचा नारा दिला पण आज सत्तेत आल्यावर तोच गरीब हटला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु या सत्ताधाऱ्यांना आपण निवडणुकीत काय बोलतो याचे भान राहिले नाही. जनतेसाठी हा महादेव जानकार काम करत आहे. सर्वसामान्य माणसांना बळ देण्याचे काम रासप करत आहे.

घराणेशाही आणि प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे, पण यासाठी जनतेला पुढे यावे लागेल. कर्जतचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एकदा रासपवर विश्वास ठेवा. काम केले नाही तर समोर बसलेल्या जनतेस जाब विचारण्याचा हक्क आहे. दिल्ली काबीज करण्याचा ध्यास आहे. कारण भारताला बलशाली राष्ट्र बनवायचे आहे यासाठी महादेव जानकर जीवाची बाजी लावेल.

यावेळी फुलेपिठावर राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.प्रल्हाद पाटील, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरद दडस, रमेश व्हरकाटे, सोनू भिसे, विकास मासाळ, भानुदास हाके, सय्यद बाबा शेख, डॉ. शिवाजीराव शेंडगे, आत्माराम कुंडकर, मंदाकिनी बडेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...