कळंबोलीत रासपतर्फे संगोळी रायन्ना जयंती निमित्त अभिवादन..!
|
संगोळी रायन्ना यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर. (छायाचित्र : ऋषिकेश जरग) |
संगोळी रायन्ना भारतीय स्वातंत्र्य लढाईतील असली स्वातंत्र्यवीर : सुदर्शन अक्कीसागर
कळंबोली : भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे अनेक महानायक उपेक्षित राहिले आहेत. भारतीय इतिहासकारांनी त्यांची जाणीवपूर्वक उपेक्षा केली आहे. परकीय ब्रिटिशांनी संगोळी रायन्ना यांची फाईल तयार केली, पण आपले म्हणवणाऱ्या लोकांनी फाईल घाळ केली. नकली लोकांना जादा महत्व देऊन त्यांच्या नावे इतिहास खपवला जात आहे. संगोळी रायन्ना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असली स्वातंत्र्यवीर आहेत, असे उदगार राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव सुदर्शन अक्कीसागर यांनी काढले. राष्ट्रीय समाज पक्ष कळंबोली शहर शाखा कार्यालयात आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांची २२५ वी जयंती साजरी करण्यात आली. अभिवादनप्रसंगी श्री. अक्कीसागर बोलत होते.
ब्रिटिशांच्या जोखडातून भारत भूमीला मुक्त करण्यासाठी उमाजीराजे नाईक, यशवंतराव होळकर, महारानी झलकारीबाई, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, नागू महादू कातकरी, राणी भिमाई यासारखे अनेक स्वातंत्र्य योद्धे लढले. इतिहास मंडणाऱ्यानी वेगळ्याच पद्धतीने इतिहास मांडला. संगोळी रायन्ना यांची जयंती राष्ट्रीय समाज पक्षतर्फे होत असल्याने अभिमानास्पद आहे. महादेव जानकर साहेब, राष्ट्रीय समाज पक्षाने उपेक्षित महानायक यांना उजेडात आणण्याचे कार्य केले. संगोळी रायन्ना समाधीस्थळी पोहचणारी पहिला राजकीय पक्ष रासप आहे. श्री. अक्कीसागर यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक सांस्कृतिक घडत आलेल्या घटनांचा समाचार घेऊन पुरोगामी व हिंदुत्ववादी यांचा चेहरा उघडा पाडला.
सुरुवातीला संगोळी रायन्ना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रासपचे हितचिंतक सुदामशेठ जरग, विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस, कळंबोली शहर अध्यक्ष आण्णासाहेब वावरे, शहर उपाध्यक्ष देवानंद मोटे, काशलिंग जानकर, शहर सचिव शहाजी शिंदे, चैतन्य जरग, आकाश राजगे, दिलीप राऊत, सागर माने, नारायण वीरकर, युवा कार्यकर्ते प्रतीक जरग व अन्य मान्यवर उपस्थित होते. संगोळी रायन्ना जयंतीनिमित्त पेढे वाटून भारतीय स्वातंत्र्य दिवस व संगोळी रायन्ना यांच्या नावे घोषणा देत जयजयकार केला. कळंबोली शहरात संगोळी रायन्ना जयंती साजरी करून रासपच्या शिलेदारांनी इतिहास घडवला, असे मत यशवंत नायक उपसंपादक आबासो पुकळे यांनी व्यक्त केले. संगोळी रायन्ना जनतेसाठी लढत होते. जवळच्याच लोकांनी फसवून दगा केला तरीही देशांसाठी संगोळी रायन्ना फासावर जाणारे थोर क्रांतीकारक आहेत, असे विचार शरद दडस यांनी व्यक्त केले.
पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्ष २० व्या वर्धापन दिन कार्यक्रमास मोठया संख्येने सहभागी व्हा : सुदामशेठ जरग
येत्या २९ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम गणेश कलामंच पुणे येथे आयोजित केला आहे. कळंबोली शहरातून मोठ्या संख्येने रासपच्या मावळ्यांनी स्वतंत्र गाडी करून जायचे आहे. भव्य दिव्य असा कार्यक्रम करायचा असल्याने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन ज्येष्ठ नेते सुदामशेठ जरग यांनी केले आहे.
संगोळी रायन्ना जयंती प्रसंगी विविध क्षणचित्रे व मान्यवर
|
संगोळी रायन्ना प्रतिमेस पुष्पहार घालताना विचारवंत सुदर्शन अक्कीसागर व दिलीप राऊत |
|
दीपप्रज्वलन करताना आन्नासाहेब वावरे बाजूस सुदर्शन अक्कीसागर. |
|
संगोळी रायन्ना प्रतिमेस अभिवादन करताना काशलिंग जानकर |
|
संगोळी रायन्ना प्रतिमेस अभिवादन करताना शहाजी शिंदे |
|
संगोळी रायन्ना जयंती प्रसंगी विचाराची देवाणघेवाण करताना रासपचे शिलेदार. |
|
प्रतिमेस अभिवादन करताना देवानंद मोटे
|
|
प्रतिमेचे पूजन करताना सुदामशेठ जरग
|
|
संगोळी रायन्ना प्रतिमा
|
|
प्रतिमेस अभिवादन करताना चैतन्य जरग
|
|
प्रतिमेस अभिवादन करताना यशवंत नायक उपसंपादक आबासो पुकळे.
|
|
शरदभाऊ दडस यांनी डिजिटल फलक तयार करून |
पोलीस निवारा कळंबोली गार्डन येथे प्रचार प्रसार करण्यासाठी लावण्यात आले.
👍👏👏
ReplyDeleteजय क्रांतीवीर संगोळी रायन्ना... जय रासप !
ReplyDeleteजय संगोळी रायन्ना जय भारत
ReplyDeleteJay Sangolli Rayanna Jay RSP Jay Hind Jay Maharashtra
ReplyDelete