आंध्रप्रदेशातील २५ जागा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार : रासप नेते महादेव जानकर
तिरुपती येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक
तिरूपती - आंध्रप्रदेश | यशवंत नायक ब्यूरो
आगामी होऊ घातलेल्या सार्वत्रिक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, आंध्रप्रदेशातील २५ जागांवर राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार मैदानात उतरवून स्वबळावर लढवणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव यांनी केले. ७ ऑगस्ट २०२३ रोजी तिरूपती येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रिय कार्यकारणी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकित तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक रासपचे प्रतिनिधि उपस्थित होते.
रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहब यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. रासप नेते महादेव जानकर मार्गदर्शन करताना म्हणाले, देशभरात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. आंध्र प्रदेशातील येणारी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार मैदानात उतरवू. पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी यांनी वन बूथ टेन युथ तयार करून संघटन मजबूत करावे. गावोगावी पक्षाच्या शाखा उघडाव्यात.
या बैठकीत रासपचे संस्थापक सदस्य सिद्दप्पा अक्कीसागर, राष्ट्रिय महासचिव कुमार सुशील, तेलंगाना प्रभारी गोविंदराम शूरनर, राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे, कर्नाटक प्रभारी सुनिल बंडगर, तामिळनाडूचे के एस गौतम, लायन डी. राजा, आंध्रप्रदेशचे नारायण कुरूबा, के एस. नजुंनदास, मनमोहन जी, पी. एन. वेंकट रमना, के रेड्डी शेखर, ए. डी अजंने, कर्नाटक प्रभारी सुनिल बंडगर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment