रासेफतर्फे महाराणी अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन..!
आमच्याकडे मतांचे बळ असून, सत्तेत स्थान का नाही ? : प्रबोधनकार गोविंदराव शुरनर
मुंबई : आमच्याकडे मतांचे बळ असून, सत्तेत स्थान का नाही? असा सवाल प्रबोधनकार गोविंदराव शुरनर यांनी केला आहे. राष्ट्रीय समाज एम्पलॉयज फेडरेशन (रासेफ) आयोजीत अहिल्यामाई होळकर २२८ वा स्मृतीदीन अभिवादन कार्यक्रमात प्रबोधनकार गोविंदराव शूरनर बोलत होते.
श्री. शूरनर पूढे म्हणाले, 1989 पर्यंत आम्हाला अहिल्यामाई होळकर यांच्याबद्दल काहीही माहीत नव्हते. बीएससी फर्स्ट वर्षाला असताना शिक्षणावर पाणी फिरलेले. पार्ट टाइम जॉब, पूर्णवेळ समाजकार्य चालू होते. मंडल चळवळ चालू झाली. महामानव कांशीराममुळे इतिहास कसा वाचायचा, कसा लिहायचा हे शिकलो. अहिल्यामाईंची महाराष्ट्रात पुण्यतिथी होत होती. 1994 ला जानकर साहेब भेटले. शाहू जयंतीला होळ गावातून चोंडीपर्यंत रॅली काढून १३ ऑगस्टला समारोप केला. अक्कीसागर साहेब यांनी रॅलीचा संपूर्ण महाराष्ट्रात मार्ग ठरवला. जानकर साहेब उत्तर प्रदेशात आजारी होते. पुढे जानकर साहेब पुसदला रॅलीत सामील झाले.
आमचे महापुरुष उपेक्षित आहेत, कारण त्याकाळात लेखन करणारे आपले नव्हते. इंदौर, महेश्वर येथ जाऊन अहिल्यामाईचे जीवनावरील हिंदीतले पुस्तकं मिळवले. अहिल्यामाईवर लिहलेले पुस्तकं बामसेफचे लोक घेत नव्हते. पुढे बहुजन संघटकमध्ये पुस्तकावर एक लेख छापला. पुढे सर्वजण वाचू लागले. लोकमाता ही त्याकाळी पदवी होती. मातेने लोक कल्याणकारी राज्य केलेले आहे. महिलांसाठी उद्योग सुरू केले. ज्या समाजात वाचन संस्कृती नाही तो समाज प्रगती करू शकत नाही. माणसं मारून राज्य करण्यापेक्षा, मन जोडून राज्य केलेल चांगले सम्राट अशोकाने आम्हाल वारसा दिला. सरकारी पैसा सरकारच्या कामासाठी वापरयचा लोकमातेची शिकवन आहे. शिक्षकाचा शिक्षण अधिकारी झाल्यावर शिक्षणाधिकारी होतो. मग मल्हारराव होळकर सुभेदार असल्याचे सांगतात पण मल्हारराव होळकर राजे होते. दिल्लीच्या बादशहाला हादरवून सोडणारा राजा मल्हाराव होळकर आहेत.
यावेळी रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, महाराष्ट्र महासचिव जयसिंग राजगे सर, जेष्ठ नेते बाळकृष्ण लेंगरे मामा, बाबुराव पांढरे, राजेंद्र कोकरे, दशरथ घुले, यशवंत नायकचे उपसंपादक आबासो पुकळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment