Saturday, August 19, 2023

कर्नाटकातून राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापदिन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने जाणार : शिवलिंगप्पा किन्नूर

कर्नाटकातून राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापदिन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने जाणार : शिवलिंगप्पा किन्नूर 

कलबूर्गी: पत्रकार परिषदेत शिवलिंगप्पा किन्नूर, जिल्हाध्यक्ष देवेंद्र चीलग्गर, बाजूस कल्याण कर्नाटक रासप पदाधिकारी.

कलबुर्गी पासून विजयपुरा, बागलकोट, हुबळी - धारवाड - बेळगाव पर्यंतच्या सर्व तालुका ठिकाणी सभांचे आयोजन

कलबुर्गी : यशवंत नायक ब्युरो 

येत्या २९ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन महाराष्ट्र राज्यात पुणे येथे साजरा केला जाणार आहे, अशी माहिती रासपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. काल शुक्रवारी शहरातील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत श्री. किन्नूर बोलत होते. 

दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेला व बसवण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कलबुर्गी येथील सुमारे १ हजारांच्या संख्येने जन स्वराज यात्रा निघणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेत राज्यभरातून पाच हजारांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत.

जनतेच जन स्वराज उभारण्यासाठी रासप पक्षाने कलबुर्गी ते विजयपुरा, बागलकोट, हुबळी - धारवाड आणि नंदगड (बेळगाव) पर्यंतच्या सर्व तालुका प्रमुख ठिकठिकाणी सभा घेणार आहोत. जन स्वराज यात्रेत कमीत कमी २ लाखांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे सांगितले. कर्नाटकातील जनतेनं २९ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या महाअधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवलिंगप्पा कीन्नुर यांनी केले.

ते पुढे म्हणाले, राज्यातील मागासवर्गीयांच्या ओबीसी, एमबीसी परीक्षेचे अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात यावी. ओबीसी आणि एमबीसी गरीबांना निवारा द्यावा. बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात यावे आणि कर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. देशातील औद्योगिक कामगारांना समान सुविधा दिल्या पाहिजेत. शेतकरी व महिलांना जास्तीत जास्त बजेट देऊन मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कल्याण कर्नाटक आरक्षणाचा ३७१(जे) अर्ज ओबीसी आणि एमबीसींच्या व्यवस्थेत अन्यायकारक आहे. हे देखील त्वरित दुरुस्त करावे. KKRDB अंतर्गत सर्व गावांना पुरेसे अनुदान देण्यात यावे. या भागातील महिलांसाठी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शौचालय इमारती बांधण्यासाठी पुरेसे अनुदान जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.





1 comment:

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...