तेलंगणात लोकसभेच्या १७ व विधानसभेच्या ११९ जागांवर रासप स्वबळावर लढणार : शुरनर
तेलंगणा प्रभारी गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांचा सत्कार करताना स्थानिक रासप पदाधिकारी. |
हैदराबाद येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक
हैदराबाद- तेलंगणा | यशवंत नायक ब्यूरो
तेलंगणातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ११९ जागा व लोकसभेच्या १७ जागांवर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. तेलंगणा राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष आपले अस्तित्व दाखवणार आहे. येथिल स्थानिक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. अनेक उमेदवार रासपातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत अशी माहिती रासपचे तेलंगणा प्रभारी गोविंदराव शुरनर यांनी यशवंत नायकशी बोलताना दिली. श्री. शुरनर हे हैदराबाद येथून बोलत होते. दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी राष्ट्रीय समाज पार्टीचे कार्यकर्ता मिंटिगचे आयोजन केले होते. या बैठकित तेलंगना रासप पदाधिकारी व अतिथी राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा उपस्थित होते.
तेलंगाना प्रभारी राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करून स्वबळावर निवडणुक लढवाव्यात. पदाधिकारी यांनी वनबूथ टेनयूथसह प्रत्येक गावात शाखा तयार कराव्यात. या बैठकित बीआरएस पार्टीचे नगरसेवक नागेस कुरमा यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. बैठकीसाठी तेलगाना युवा रासप नेते जयपाल कुरमा, नरसिमलु नविन, राकेशजी, बरगद्दा नागेश, सुभाष मासाळ उपस्थित होते. दि. २९ ऑगस्ट २०२३ ला राष्ट्रिय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिवस महाराष्ट्र पुणे येथे साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास राज्यातील सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. नारायणखेड जिल्ह्याचे रहिवाशी असलेले रासपचे युवा नेते जयपाल कुरुमा खास रासप नेत्यांची भेट घेण्यासाठी आले होते.
No comments:
Post a Comment